Nanded Nagar Panchayat : नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. यामध्ये दोन नगरपंचायतींमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले तर एका ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.


जिल्ह्यातील नायगाव आणि अर्धापूरमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली. अर्धापूरमध्ये छत्रपती कानोडे यांची नगराध्यक्षपदी तर यास्मिन सुलताना यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नायगांवमध्ये नगराध्यक्षपदी काँग्रेच्या गीता जाधव आणि उपनगराध्यक्षपदी काँग्रेचेच विजय चव्हाण यांची निवड झाली. माहुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे फिरोज दोसानी तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या नाना लाड यांचा विजय झाला. माहूरमध्ये राष्ट्रवादी सेना एकत्र आल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
 
माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला दूर ठेवून शिवसेनेचा पाठिंबा घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसलाय. याठिकाणी राष्ट्रवादीचे सात आणि शिवसेनेचे तीन सदस्य होते. तर सहा सदस्य असलेल्या काँग्रेसने शिवसेनेच्या पाठिंब्याने नगराध्यक्ष पदासाठी व्युव्हरचना आखण्यात आली होती. परंतु, अखेरच्या क्षणी शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठींबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोसानी यांचा विजय झाल. या निवडणुकीत भाजपचा एक सदस्य तटस्थ राहिला.


अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे छत्रपती उर्फ पुंडलिक कानोडे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे छत्रपती कानोडे हे अर्धापूरचे नगराध्यक्ष होणार हे निश्चित झाले होते. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा आज झाली. 


अर्धापूर नगरपंचायतीत सलग तिसऱ्यांदा काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे. 17 जागांपैकी काँग्रेसकडे 10 नगरसेवक असले तरी एक अपक्ष आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने काँग्रेसला समर्थन दिले आहे. 


महत्वाच्या बातम्या