Congress Protest: महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज पुन्हा एकदा व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, गेल्या आठवड्याभरात पेट्रल आणि डिझेलच्या किंमती आठवेळा वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये काँग्रेसच्या वतीनं महागाईविरोधात लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


महागाईच्या विरोधात आज उल्हासनगर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आला. यावेळी गॅस सिलेंडर आणि बाईकला हार फुलं वाहून महागाईचा निषेध करण्यात आला. कॅम्प नंबर 5 मध्ये हे आंदोलन करण्यात आलं. सिलेंडर आणि पेट्रोलचे दर दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठीत आहेत.त्यामुळे सर्वसामान्यांनी कसे जगायचे? सा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. दरम्यान, महागाईचा भस्मासुर म्हणून पंतप्रधानांच्या छायाचित्राचा बॅनर तयार करण्यात आला होता.याशिवाय केंद्र सरकारच्या नावाने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. 


व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या महागाईचा बॉम्ब फुटला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता 250  रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 250 रुपयांची वाढ झाल्याने मुंबईमध्ये 19 किलोग्रॅमसाठीचा हा दर आता 2  हजार 205 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरचा दर 1 हजार 955 इतका होता. दिल्लीमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 2 हजार 253 रुपयांवर पोहोचली आहे.


इंधन दरवाढीचा भडका
शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. आजच्या दरांनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 85 पैशांची तर डिझेलच्या दरांत 85 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 116.67 रुपये आणि डिझेल 100.89 रुपयांवर पोहोचलं आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे.  


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha