लातूर : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच आता लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. धीरज देशमुख यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत: ची काळजी घ्यावी. तसेच लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले आहे. 


डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या मी पुढील उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझी तब्येत चांगली असल्याचे देखील धीरज देशमुख यांनी सांगितले आहे. राज्यातील कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत आहेत. याला राज्यातील नेतेमंडळी देखील हातभार लावत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारोंची गर्दी असलेल्या विवाहसोहळ्यांसह अनेक राजकीय कार्यक्रमांना सार्वजनिक ठिकाणी ही नेतेमंडळी हजेरी लावत होते. आता या नेत्यांनाच कोरोनाची लागन झाली आहे. तसेच चार दिवसांच्या अधिवेशनात राज्यातील 10 मंत्री (ministers), 20 आमदार (mla) कोरोना बाधित (infected coronavirus) झाले होते. 


या नेत्यांना कोरोनाची लागण


महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी 
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार इंद्रनील नाईक
आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील


या राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच आता धीरज देशमुख यांनीही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांसह आता राजकीय नेत्यांनीसुद्धा काळजी घेणे गरजेच आहे.


महत्त्वाच्या बातम्या: