Sushilkumar Shinde : काँग्रेसच्या मांडीवर आम्ही जन्मलो, इथेच वाढलो, खेळलो, काँग्रेसला सोडून बिलकुल जाणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे  (Sushilkumar Shinde) यांनी केलं. लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha election) प्रणिती शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपमध्ये जातील, असा आरोप प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला आज सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. 


सर्वच पक्षाचे राजकीय नेते प्रचारात व्यस्त


सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षाचे राजकीय नेते प्रचारात व्यस्त आहेत. या काळात नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप टिका टिप्पणी करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील सुशीलकुमार शिंदे ( (Sushilkumar Shinde) यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपमध्ये जातील, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र, आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जन्मलो, वाढलो, काँग्रेसला कधीच सोडणार नसल्याची भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. याबाबत सुशीलकुमार शिंदे यांना विचारले असता शिंदे म्हणाले की, ते त्यांचं कामच आहे. त्यामुळे विश्वास ठेवण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे यांचं महत्त्व लक्षात आल्याचे दिसत आहे असंही शिंदे म्हणाले. 


लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सुशिलकुमार शिंदे परिवाराची चौकशी होण्याची शक्यता


लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सुशिलकुमार शिंदे परिवाराची चौकशी सुरू होईल. ते स्वतःला वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे. अपक्ष उमेदवार अतिश मोहन बनसोडे यांना वंचितने सोलापूरमध्ये पाठिंबा दिला आहे. त्यांच्या प्रचारावेळी ते बोलत होते. शिंदे परिवार भाजपमध्ये जाईल हा दावा केल्यानंतर आंबेडकरांनी आणखी एक आरोप केला आहे.  शिंदे यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये देशात आणि विदेशातील संपत्ती लपवली आहे. तसेच त्यांच्यावरील गुन्ह्याचा उल्लेख त्यात नाही. त्यामुळे या निवडणुकीनंतर त्यांची चौकशी सुरू होईल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यांच्या या सर्व आरोपांना आज सुशीलकुमार शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नसल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. कारण आमचा जन्मच काँग्रेसच्या मांडीवर झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Loksabha Election : पश्चिम महाराष्ट्राने गल्ली ते दिल्लीपर्यंत घाम फोडला, साखर पट्ट्यातील अंडर करंट अजूनही समजेना!