Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टी पाहणीदौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना अब्दुल सत्तार यांनी दारु पिता का? असा प्रश्न विचारला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. सचिन सावंत यांच्या ट्वीटनंतर अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे.
गेल्याआठवड्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड दौऱ्यावर आले होते. यावेळी बीडमधील रेस्ट हाऊसमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा देत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी चहा नको म्हटले. त्यावर अब्दुल सत्तार यांनी तुम्ही दारू पिता का? असं विचारलं आणि आता हाच व्हिडिओ सचिन सावंत यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.
सचिन सावंत यांनी व्हिडीओ ट्वीट करत अब्दुल सत्तार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा? असा सवालही सचिन सावंत आपल्या ट्वीटमधून उपस्थित केला आहे. यासोबत सचिन सावंत यांनी शायरीही ट्वीट केली आहे.
गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब
किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब
एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो
पाहा सचिन सावंत यांचं ट्वीट-
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांचं उत्तर..
आदित्य ठाकरे यांनाही अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. पुण्यातील शिरुर येथे बोलताना त्यांनी सत्तार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. कृषिमंत्र्यांचं राजीनामा घ्या. आमच्या सरकारमध्ये असं कोणी बोललं असतं तर त्याचा राजीनामा घेतला असता. यांना बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाही, असे वक्तव्य आदित्य ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत देणारच-अब्दुल सत्तार
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मालेगाव परिसरातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी तूर कापूस आदी पिकांची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवादही साधला तर लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असेही सांगितलं. शिवाय शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.