Nana Patole : ज्यांना मुलं बाळं नाहीत, अशा लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाहीत, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लगावला. युक्रेनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोनवर बोललो, त्यांचे व्हिडीओ पाहिले आहेत. तसेच भारताच्या विदेश मंत्रालयाशी देखील अनेकदा बोललो असून, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे नाना पटोले म्हणाले.


ज्याप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पाच राज्यांच्या निवडणुका आल्या, तेव्हा भारताचे प्रधानसेवक प्रचारात व्यस्त होते. दुसरीकडे कोरोना काळात मृतदेह गंगा नदीत तरंगतांना दिसले, तेव्हापण त्यांना जाग आली नसल्याचे म्हणत नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा लगावला. आता पाच राज्यात निवडणुका सुरु आहेत. या निवडणुका सुरु असतानचं  युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु होणार असल्याचे रशियाच्या माध्यमातून सगळीकडे अल्टिमेट दिले जात होते. तेव्हाही भारताचे प्रधान सेवक निवडणुकीत व्यस्त होते. मात्र, युद्धाआधीच युक्रेनमध्ये असलेल्या बाकी देशांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या देशांनी स्वदेशात घेऊन येण्याची सोय केली असल्याचे तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र, आपल्या देशातून कुठलीही मदत युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याचे पटोले यावेळी म्हणाले.


युक्रेनमध्ये असलेले आपल्या देशातील केंद्रीय दूतावास त्या विद्यार्थ्यांचा फोन उचलत नाहीत. त्यांचे म्हणणे एकूण घेण्यासही तयार नसल्याचा आरोप पटोले यांनी केला. केंद्र सरकार म्हणते तुम्ही काही गडबड करु नका, आम्ही सगळं बघून घेऊ. मात्र, आज ज्यांची मुलं त्याठिकाणी शिकत आहेत, त्यांच्या कुटुंबियांना काय वेदना होत असतील, त्या ज्यांना मुलं बाळ नाहीत त्यांना कळणार नाहीत असा टोलो पटोलेंनी पंतप्रधान मोदींना लगावला. केंद्रातील सरकार आपल्या देशातील नागरिकांना युक्रेनमधून आणण्यात कमी पडले आहे. हे सत्य आहे आणि त्यांनी हे मान्य केलं पाहिजे असे पटोले म्हणााले. त्या ठिकाणच्या मुलींचे व्हिडिओ पहिले तर त्या मुलींनी सांगितले की, या ठिकाणावरच्या मुली गायब होत आहेत. मुलांना मात्र काही करत नाहीत असे मुलींचे व्हिडीओ येत आहेत. हे सगळं बघून देशाचे पंतप्रधान जागे झाले असतील तर त्यांनी सगळी मुलं देशात परत आणली पाहिजेत असे पटोले म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: