नवी दिल्ली : ज्या सनातन संस्थांवर डॉ. नरेद्र दाभोलकरांच्या हत्येचे आरोप आहेत त्या संस्थांवर सरकारनं ताबडतोब बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. तसेच संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही दलवाई यांनी सरकारकडे केली आहे.


दलवाई यांनी बोलताना सांगितले की, 'आरे आणि नाणार या दोन्ही प्रश्नांबाबतच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत, याचा मला खरचं फार आनंद आहे. नाणार आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो, तसेच मी तिथे सत्याग्रही केला होता. आमच्या पक्षानेही या आंदोलनात अनेक भूमिका घेतल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही निर्णयांचं मी स्वागत करतो. तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणासंबंधी ताबडतोब चौकशी करावी. संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्या बाबतीत सरकारने ताबडतोब भूमिका घेणे आवश्यक आहे. भीमा-कोरेगाव मध्ये या दोन्ही व्यक्तींचा थेट सहभाग होता. परंतु ते विशिष्ट विचारांचे असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने यासंदर्भात कडक भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे.'

पाहा व्हिडीओ : 



'सांगलीमध्ये दंगल झाली त्यावेळी जयंत पाटलांनी भिडेंची बाजू घेतली आहे. त्यामुळे आता त्यांची बाजू घेऊ नका असं मी जयंत पाटलांना सांगणार आहे. भिडे आणि एकबोटे या दोन व्यक्ती महाराष्ट्रात अत्यंत वाईट काम करतात. त्यामुळे त्यांना अद्दल घडवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सनातन संस्थेवर बंदी घालणं गरजेचं आहे. कारण ही संघटना दहशतवाद पसरवणारी संघटना आहे. फक्त संस्थाच नाहीतर संस्थेच्या प्रमुखांवरही कारवाई केली गेली पाहिजे.' असंही त्यांनी बोलताना सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'एवढचं नाहीतर मालेगावच्या खटल्यात आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर आरोपी असूनही भाजपने त्यांना खासदार केलं. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. दहशतवाद पसरवणारी कोणत्याही समाजाची व्यक्ती असली तर त्याचं समर्थन करणं अत्यंत चुकीचं.'

आजपर्यंत शिवसेनेने सनातन संस्थेला कधीही पाठिंबा दिलेला नाही. तसेच महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर महाराष्ट्र शांत ठेवणं आवश्यक आहे. काँग्रेस सरकारच्या काळात अंमलबजावणी झाली नाही ती आमची चूक होती. पण आता सध्या महाराष्ट्रात पुरोगामी सरकार आलेलं आहे. महाराष्ट्राची प्रगती करणार सरकार आलेलं आहे. महाराष्ट्रात शांतता ठेवावी आणि विकास करावा ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. दाभोलकर, पानसरे यांच्यासारखी माणसं मारली जातात, त्याच्यामागे कोण सूत्रधार आहे ते शोधून काढलं पाहिजे. सनातन संस्थेचे जे लोक बोलतात त्यावरुन हे स्पष्ट होत आहे, सरकार नक्की या संबंधात विचार करतील असा विश्वास काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र कर्जाच्या खाईत, राज्यावर पावणेसात लाख कोटींचं कर्ज; प्रत्येकाच्या डोक्यावर 54 हजारांचा भार

मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या; खासदार संभाजीराजेंची मागणी

INX Media प्रकरणी पी. चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर, 106 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर येणार

राज्यातील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही : उद्धव ठाकरे