- उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता, दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाची बैठक, उपमुख्यमंत्रिपदाचा मात्र निर्णय नाही
- समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनसह कोणत्याही प्रकल्पांना स्थगिती नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट, प्रकल्प अधिकाऱ्यांशी चार तास खलबतं
- शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं विचारणाऱ्यांकडून पवारांनाच सत्तेसाठी ऑफर, सामनातून भाजपवर निशाणा, अजित पवारांचा पापडही भाजता आला नाही म्हणून घणाघात
- बंडखोरी माझ्या रक्तात नाही, भाजप सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम देताना पंकजा मुंडेंचं विधान, 12 तारखेचा मेळावा दबावासाठी नसल्याचंही स्पष्ट
- महाराष्ट्रावर 6 लाख 80 हजार कोटींचं कर्ज, 15 व्या वित्त आयोगाच्या अहवालात खळबळजनक माहिती, सरकार श्वेतपत्रिका काढण्याची शक्यता
- राज्यातला प्रमुख बाजारपेठेत कांद्याला प्रतिकिलो 120 रुपयांचा दर, परदेशातला कांदा दाखल झाल्यानंतरच दर कमी होण्याची शक्यता
- पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तीन माजी संचालकांना अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या 12 वर
- एक जूनपासून देशात एक देश रेशनकार्ड, देशातल्या कोणत्या रेशन दुकानातून धान्य आणि इतर खरेदी करता येणार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची माहिती
- डोंबिवलतील लोकलच्या गर्दीचा मुद्दा थेट लोकसभेत, डोंबिवलीकर रेल्वे प्रवाशांसाठी सुप्रिया सुळेंचा पुढाकार, लोकलची संख्या वाढवण्याची मागणी
- मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार, पुढच्या 10 दिवसांत एसी लोकल सेवेत, 25 डिसेंबरपासून पहिली एसी लोकल धावण्याची शक्यता