Prakash Ambedkar on Congress : लोकसभा (Loksabha Election 2024) निवडणुकीपूर्वी जागावाटपात महाविकास आघाडीला अटी आणि शर्थींनी हैराण करून सोडलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला विधानसभेत आघाडी करण्यासाठी दोनदा साद घातली होती. आता ही साद ताजी असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचा न्यायाशी संबंध नसल्याची टीका ट्विट करून केली आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत न्याय पत्रावरून प्रचार करत असतानाच प्रकाश आंबडेकर यांनी रोहित वेमुला प्रकरणावरून टीका केली आहे. 


काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!


प्रकाश आंबेडकर यांनी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही! रोहित वेमुला हा दलित नव्हता, तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला प्रकरणाच्या तपासाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले होते. हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत येते. रोहित वेमुलासाठी काँग्रेसचा न्याय म्हणजे आपली "खरी जातीय ओळख" शोधून काढेल या भीतीने रोहितने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येसाठी ओढले गेलेले कोणतेही तथ्य किंवा परिस्थिती रेकॉर्डवर उपलब्ध नाही. त्याच्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. तपास अधिकाऱ्यांनी राधिका वेमुला विचारले की ती तिची जात स्थान निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी घेण्यास इच्छुक आहे का?






काँग्रेस न्यायाची अशी व्याख्या करते का?


काँग्रेस न्यायाची अशी व्याख्या करते का? रोहितच्या आई, बहीण आणि भावासाठी हा तुमचा न्याय आहे का? शैक्षणिक संस्थांमध्ये दर मिनिटाला भेदभाव आणि छळ करणाऱ्या एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी हा तुमचा न्याय आहे का?हा तुमचा दलितांचा न्याय आहे का? काँग्रेसला माझा सल्ला आहे की न्याय हा शब्द वापरणे बंद करा, जर तुम्हाला त्याचा अर्थ काय आणि त्याचा अर्थ काय हे माहित नसेल तर! न्याय ही क्षुल्लक संज्ञा नाही! काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा. 


तर ते आमचे ऑफर नक्कीच स्वीकारतील


तत्पूर्वी, लातूरमधील जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा काँग्रेसला आघाडी करण्यासाठी साद घातली होती. आंबेडकर म्हणाले होते की, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. सध्या काँग्रेसमध्ये जे होत आहे ते काही बरोबर नाही अशी त्यांची धारणा आहे. विधानसभेत काँग्रेसवाले जर तयार असतील, तर एकत्र आम्ही विधानसभा लढू. मात्र, आत्ताच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काँग्रेसचे सँडविच होत आहे. काँग्रेस पक्षाला जर सँडविच व्हायचं नसेल तर ते आमचे ऑफर नक्कीच स्वीकारतील, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या