लातूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे भारतीय जनता पक्षाबरोबर असलेले संबंध उघडे झाले आहेत. हे माहीत झाल्यानंतर काँग्रेसने त्याबाबत निर्णय घेणे चांगलं असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Congress)यांनी व्यक्त केलं आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये येणार होते. मात्र, त्यांच्या मनात काय चाललं आहे हे लक्षात येत नाही असं मत नाना पटोले यांनी काल (1 मे) लातूरमध्ये व्यक्त केलं होतं. त्याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांच्या भारतीय जनता पक्षाबरोबर असलेले संबंध उघड झाले असून काँग्रेसने योग्य तो निर्णय घ्यावा असा सल्ला दिला.
तर ते आमचे ऑफर नक्कीच स्वीकारतील
आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये यामुळे संभ्रम आहे. सध्या काँग्रेसमध्ये जे होत आहे ते काही बरोबर नाही अशी त्यांची धारणा आहे. अशी परिस्थिती राज्यातील अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे. येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसवाले जर तयार असतील, तर एकत्र आम्ही विधानसभा लढू. मात्र, आत्ताच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सँडविच होत आहे. काँग्रेस पक्षाला जर सँडविच व्हायचं नसेल तर ते आमचे ऑफर नक्कीच स्वीकारतील, असेही प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केले.
प्रकाश आंबेडकर आज (2 मे) लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांच्या प्रचारासाठी आले होते. लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाची स्थिती सध्या वाईट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सँडविच होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या