सांगली : सांगली महापालिकेच्या विशेष सभेत आज सभागृह नेत्याचा आरोप-प्रत्यारोपावरुन तोल ढासळला. मिरजेतील पाणी योजनेवरून शिवसेनेच्या नगरसेवकासोबत आरोप-प्रत्यारोप सुरु होते. यातच सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकाने माईक महापौरांच्या दिशेने भिरकावला.
सत्ताधारी काँगेसचे नगरसेवक आणि महापालिकेचे सभागृह नेते असलेले किशोर जामदार यांनी आपल्या हातातील माईक महापौरांच्या पिठासनाकडे भिरकावला आणि महापौरांच्या समोरील राजदंडही उचलला. यामुळे सभेतील वातावरण चांगलंच तापलं.
सभा सुरु असताना शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी अमृत योजनेच्या विषयावरुन सत्ताधारी काँग्रेसला टीकेचं लक्ष बनवलं. यावेळी शेखर माने यांच्या आरोपामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांनी माने यांचे आरोप खोटे असल्याचे सांगत शब्द मागे घेणेची मागणी केली.
यावेळी चर्चेतून वाद वाढल्याने सभागृह नेते किशोर जामदार यांनी आपल्या हातातील माईक महापौरांच्या पिठासनाकडे भिरकावला आणि महापौरांच्या समोरील राजदंडही उचलला.
यावेळी राजदंड उचलणे आणि सभागृहात माईक फेकून मारणे याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी केली.
सांगली महापालिकेत गदारोळ, काँग्रेस-शिवसेना आमनेसामने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 May 2018 04:53 PM (IST)
मिरजेतील पाणी योजनेवरून शिवसेनेच्या नगरसेवकासोबत आरोप-प्रत्यारोप सुरु होते. यातच सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकाने माईक महापौरांच्या दिशेने भिरकावला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -