Nashik: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्याप्रकरणाने राजकारणाला वेगळंच वळण आलं आहे. हत्याकांडातील संशयित आरोपींना पकडल्यानंतर वाल्मिक कराडवरही (Walmik Karad) मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अजूनही यातील एक आरोपी फरार आहे. दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील संशयित आरोपी नाशिकमध्ये असल्याच्या अफवांनी एकच खळबळ उडाली. संशयित आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) नाशिकरोड भागातील मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याची रात्री पसरली शहरात चर्चा रंगली होती. या अफवेने नाशिक पोलीस अलर्ट मोडवर आले होते. या संपूर्ण परिसरात पोलिसांनी पहाणी केली. मंदिर परिसरातील CCTV फुटेजही तपासले. रात्रभर झालेल्या सर्च ऑपरेशननंतर सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीचे फोटो कृष्णा आंधळे असल्याच्या गैरसमजाने व्हायरल झल्यानं खळबळ उडाली होती असं समोर आलं. हे फोटो आरोपी कृष्णा आंधळेचे नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Santosh Deshmukh Case)
नाशिक पोलिसांनी अफवेच्या गोंधळानं केलं सर्च ऑपरेशन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिर परिसरात दिसल्याच्या अफवांनी शहरात मोठी खळबळ माजवली. रात्री उशिरा ही चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामुळे नाशिक पोलिस तत्काळ ॲक्शन मोडवर (Nashik Police) आले. उपनगर पोलिसांनी मुक्तिधाम मंदिर परिसराची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज आणि लोजिंग रेकॉर्डची बारकाईने तपासणी करण्यात आली. अफवांचा आधार घेत, नागरिकांनी ज्या व्यक्तीला कृष्णा आंधळे म्हणून ओळखले, ती खरंच तोच आहे की नाही याची पडताळणी करण्यात आली. (Krushna Andhale)
सोशल मीडियावर व्हायरल फोटोवरून गोंधळ
कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचे भासवणारे काही फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. या फोटोमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हे फोटो कृष्णा आंधळेचे नसल्याचे स्पष्ट झाले. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सर्च ऑपरेशन करून अफवा खोट्या असल्याचे सांगितले. नागरिकांना खोट्या अफवांवर (False Information) विश्वास न ठेवण्याचे आणि परिस्थिती शांत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Social Media)
हेही वाचा: