Retired Judge M. L. Tahaliyani Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या (Santosh Deshmukh Murder Case) चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलियानी (Retired Judge M. L. Tahaliyani) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहणार आहे. समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा तसेच कागदपत्रे जप्त करण्याचा, झडतीचा अधिकार राहणार आहे. सहा महिन्याच्या आत समितीने आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे.
सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलियानी यांचा जन्म 23 डिसेंबर 1953 रोजी राजस्थान राज्यातील सरदार शहरात झाला. 26/11 खटल्यातील न्यायाधीश असलेल्या ताहलियानी यांनी त्यांच्या कार्यशैलीने न्यायलयीन कामकाजात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी कसाबला दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. याशिवाय गुलशन कुमार हत्या प्रकरणात देखील ते न्यायाधीशही होते. ताहलियानी हे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करतात. तर न्यायालयीन सुनावणी नसतानाही ताहलियांनी सुट्टी घेत नाहीत.
कोण आहेत निवृत्त न्यायाधीश ताहलियानी? (Who Is M. L. Tahaliyani)
बीड, परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चाचपणी करुन सेवानिवृत्त न्यायाधीशांची केली नियुक्ती..
दोन ही न्यायाधीश हे कडक शिस्तीचे मानले जात असून त्यांची कारकिर्द ही कर्तव्यदक्ष न्यायाधिश म्हणून राहीलेली आहे..
दोन ही प्रकरणात न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी या न्यायाधिशांची चाचपणी करुन गृह विभागाला आदेश दिले होते...
निवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याच्या विरोधात जो खटला चालला होता त्यात ताहलियानी हे न्यायाधीश होते..
त्यांनी कसाबला दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. याशिवाय गुलशन कुमार हत्या प्रकरणात देखील ते न्यायाधीशही होते.
याशिवाय सीबीआय प्रकरणे हाताळण्यासाठी एक विशेष न्यायाधीश देखील म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं...
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या चौकशीसाठीही निवृत्त न्यायाधीश व्ही एल आचलिया यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.
आचलिया यांनी मंत्रालयात विधी व न्याय विभागात सचिव म्हणून काम पाहिलेल आहे. आचलिया हे कर्तबगार न्यायाधिश आणि अधिकारी मानले जातात...
कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं?, VIDEO:
संबंधित बातमी:
Walmik Karad MCOCA: मकोका म्हणजे नेमकं काय? शिक्षा काय, वाल्मिक कराडची आता सुटका होणं कितपत शक्य?