सांगली : राज्य सरकारकडून झोननिहाय नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दारू दुकानांसह अन्य दुकाने सोमवारपासुन सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. बाजारपेठेतील मात्र कोणतेही दुकान उघडता येणार नाहीत. तसेच लग्न कार्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर इस्लामपूर शहर कंटेनमेंट झोनमुक्त करण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केलं. सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेल्याने सोमवारपासून अनेक निर्बंध प्रशासनाकडून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात येणार नाही.


सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांनी खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, मास्क, सोशल डिस्टन्स आणि कोरोना नियम पाळणे गरजचे आहे. तसेच 65 वर्षीय व्यक्ती, गर्भवती महिला आणि 10 वर्षांच्या आतील मुलांना मात्र घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अत्यावश्यक कारणासाठी फक्त या सर्वांना बाहेर पडता येणार आहे.


राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी


सांगलीमध्ये काय सुरू होणार?




  • रहिवाशी क्षेत्रात पाच दुकाने सुरू.

  • जीवनावश्यक वस्तूंबरोबर इतर सर्व दुकाने होणार सुरू.

  • हेअर सलून, ब्युटी पार्लर.

  • दारू दुकाने फक्त पार्सल.

  • लग्न कार्याला 50 लोकांची परवानगी.

  • अंत्यविधीला 20 लोकांना परवानगी.

  • सर्व उद्योग सुरू करण्याला परवानगी. मात्र, मजूर कामगारांची जवाबदारी व नियम पाळून कारखाने सुरू करण्याची अट.

  • प्रवासासाठी टॅक्सी, रिक्षा, दुचाकी यांना सोशल डिस्टन्स पाळून वाहतूक करण्याची परवानगी.

  • ग्रामीण भागासह शहरी भागातील बांधकामांना परवानगी तर शहरी आणि ग्रामीण भागातील रहिवाशी क्षेत्रात किराणामाल दुकानाबरोबर इतर पाच दुकाने फक्त सुरू करता येणार आहेत. एका रांगेत एकापेक्षा पाच दुकाने असतील तर त्याठिकाणी दुकाने सुरू करता येणार नाही, असे यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.


धारावीत कोरोनाचा कहर, मुंबईतल्या प्रतिधारावीत मात्र कोरोनाचे केवळ दोन रुग्ण


खासगी कार्यालये 33 टक्के मनुष्यबळाचा वापर करून सुरू करू शकतील. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये ही उपसचिव व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती ही 100 टक्के तर 33 टक्के इतर कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. तथापि, संरक्षण आणि सुरक्षा सेवा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पोलीस, कारागृह, गृहरक्षक, नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित सेवा, एनआयसी, सीमा शूल्क, एफसीआय, एनसीसी, एनवायके आणि महानगरपालिका सेवा कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू राहतील. त्याचबरोबर कंटेनमेंट झोन असणाऱ्या इस्लामपूर शहरावरील कंटेनमेंट झोन रद्द करण्यात येणार आहे. 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने तेथील कंटेनमेंट झोन उठवण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागकडे पाठवण्यात आला आहे. तर कंटेनमेंट झोनमधील 100 टक्के नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी आणि येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयाची परवानगी ही आवश्यक असून पास शिवाय कोणालाही जाता येणार नाही.


लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत 91 हजार गुन्हे दाखल!


हे मात्र बंदचं राहणार




  • शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध क्लासेस यांना बंदी. ऑनलाईन/इ-लर्निग शिक्षणाला परवानगी. सर्व सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडासंकुल, तरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, परमीट रूम बार आणि ऑडिटोरियम, हॉल तसेच पान व तंबाखुजन्य पदार्थावर विक्री करण्यास बंदी आहे.

  • तसेच सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांनाही बंदी कायम असून धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावरही बंदी आहे.

  • तसेच पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास कलम 144 नूसार बंदी ही कायम असून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांच्या कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिला आहे.


Coronavirus | लवकरच पुण्यात प्लाज्मा थेरपी सुरु होणार; पुणे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर 'माझा'वर