लातूर : डॉक्टरने महिला रुग्णासोबत अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार लातूरमध्ये समोर आला आहे. महिला नियमीत तपासणीसाठी डॉक्टरकडे आली होती. याप्रकरणी डॉ. आनंद पवारविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लातूरमधील मित्रनगर येथे डॉ. आनंद पवार यांचा दवाखाना आहे. पीडित महिलेला मासिक पाळीसंदर्भात आजार झाल्याने ती गेल्या चार महिन्यापासून आनंद पवारांच्या दवाखान्यात उपचार घेत होती. दरम्यान डॉ. पवार यांनी काही चाचण्या करण्याचा सल्लाही दिला होता. त्यानुसार मंगळवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास चेकअपसाठी महिला दवाखान्यात दाखल झाली असता डॉ. पवारांनी अश्लिल वर्तन केले.


डॉ. आनंद पवार यांचा वाईट हेतू लक्षात येताच पीडित महिलेने आरडा ओरडा करत दवाखान्यातून पळ काढला. त्यानंतर पीडित महिलेने थेट शिवाजी नगर पोलीस स्टेशन गाठलं. महिलेचा आरडा ओरडा ऐकूण जमलेल्या नागरिकांनी डॉ. आनंद पवारला चोप दिल्याचंही समोर येत आहे.


पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डॉ. आनंद पवारविरोधात 354, 354-अ अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.