पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळाला जन्म दिल्यानंतर त्या मुलीने तिथेच बादलीमध्ये सोडून दिले आणि भीतीपोटी पुन्हा मुलींमध्ये येऊन झोपी गेली. काही वेळानंतर बाळाच्या आवाजाने वसतीगृहाच्या वार्डन यांनी बाळाच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता बादलीत बाळ पालथे पडले आढळून आले. याबाबत विचारणा केली असता कुणीही समोर यायला तयार नव्हते. यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान एका संशयित मुलीला आरोग्य तपासणीसाठी नेले असता हे बाळ तिचे असल्याचे निष्पन्न झाले.
यवतमाळमध्ये लग्न समारंभात सफाई कर्मचाऱ्याकडून मुलीचा विनयभंग
धक्कादायक बाब म्हणजे या आधी दोन महिन्यांपूर्वीच या मुलीची साक्री शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती, असं सांगण्यात आलं आहे. आणि या तपासणीत शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मुलीच्या रिपोर्ट नील दाखवले होते. त्यानंतर दोन महिन्यानंतर या मुलीने एका बालकाला जन्म दिला यातून शासकीय रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. याबाबत निवासी वसतीगृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील संशय बळावला आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता वसतीगृह प्रशासनाकडून पाळली जात आहे.
सध्या बाळ आणि बाळंतीण दोघांनाही पुढील उपचारासाठी धुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साक्री पोलीस ठाण्यात याबद्दल नोंद करण्यात आली असून पुढील तपास साक्री पोलीस करीत आहेत.