संबंधित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत एका लग्नात गेली होती. लग्न ज्या हॉटेलमध्ये होतं, तिथे अक्षय चांदेकर सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. यावेळी या नराधमाने खाऊचं आमीष दाखवून तिला एकांतात नेलं आणि तिचा विनयभंग केला. यानंतर तिने संपूर्ण प्रकार आई-वडिलांना सांगितला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.
मुंबईत माटुंगा स्थानकात तरुणीशी छेडछाड, विकृत अटकेत
पोलिसांनी आरोपी सफाई कर्मचारी अक्षय चांदेकरवर कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेजही आपल्या ताब्यात घेतलं. लोहारा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
याआधी असाच प्रकार मुंबईतील माटुंगा स्टेशनवर घडला होता. माटुंगा रेल्वे स्टेशनवरुन एका पुलावर आरोपीने तरुणीचा विनयभंग केला होता. तरुणी पुलावरुन जात असताना विकृत तिच्या मागून आला आणि तिची छेडछाड करुन तिथून पळ काढला. आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे तरुणीला समजलंच नाही. हतबल झालेली ती मुलगी तिथून निघून गेली. यानंतर शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी विकृताला पकडून चांगलाच चोप दिला. यामुळे नांदगावकर यांच्यावर गुन्ह्याची नोंदही झाली होती.