मुंबई : उत्तर भारतात थंडीची लाट आलीय. त्यामुळं येत्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्येही तापमानाचा पारा 3 ते 4 अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आधीच तापमान शून्याच्या खाली पोहोचलंय. शिमल्यामध्ये तर काल उणे दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. या हिवाळ्यात काल शिमल्यामध्ये सर्वात थंड दिवसाची नोंद झाली.


 हिमाचलच्या लाहुल-स्पिती या भागात बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडच्या थंड वाऱ्यामुळे तापमान कमालीचं घसरलंय. लडाख भागातही तापमानाचा पारा इतका घसरलाय की तलावही गोठून गेले आहेत. या तलावांवर नागरिक सध्या आईस हॉकी खेळण्याचा आनंद लुटत आहेत.  पुढील काही दिवसांत, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर थंडीची लाट महाराष्ट्राचाही पारा कमी करेल असा अंदाज आहे.  


पुढील 24 तासात महाराष्ट्रातल्या तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट दिसणार आहे. वातावरणात गारवा राहणार आहे.  विदर्भातल्या अनेक जिल्ह्यातील तापमान 12-14 अंश सेल्सिअस, वाशिममधील किमान सरासरी तापमान 11.5 अंशांवर जाणार आहे. पुढील चार दिवसात विदर्भातील किमान तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसची घट होणार आहे, असा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.


मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील किमान सरासरी तापमान 14 अंश सेल्सिअसवर गेले आहे. डिसेंबरनंतर तापमानात 2 ते 3 डिग्रीची घट होणार आहे. मराठवाड्यातील अनेक शहरांतील तापमान 10 ते 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.  कोकणातल्या तापमानात मोठी घट जाणवणार नाही. 20 डिसेंबरनंतर दीड ते दोन डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्यानंतर मुंबई आणि किनारपट्टी भागातील शहरांमध्ये गारवा वाढणार आहे, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने माहिती दिली आहे. 


राज्यात थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट महाराष्ट्राचाही पारा कमी करेल असा अंदाज आहे. परभणीत तापमानाचा पार घसरला आहे. परभणीत तापमानाचा पारा 11 अंशांवर गेला आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :


Bike Tips: हिवाळ्यात मोटारसायकलीवरुन ट्रिपला जाताय....नेमकी काय काळजी घ्याल?


Skin Care Tips: हिवाळ्यात कोरफड त्वचेसाठी वरदान; असे तयार करा फेस पॅक 


Winter Hair Care Tips: थंडीत उद्भवतेय ड्राय हेअर्सची समस्या? 'हे' हेअर मास्क करतील दूर