Skin Care Tips :  हिवाळ्यामध्ये (Winter Season)  त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे  त्वचेचे तीन प्रकार आहेत. थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes) आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील. घरी तयार केलेले कोरफडचे हे दोन फेसपॅक वापरल्याने तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.


व्हिटॅमिन ई आणि कोरफडचा फेस पॅक 
व्हिटॅमिन ईच्या  Tablets या स्किन संबंधित सर्व समस्या दूर करतात. व्हिटॅमिन ई आणि कोरफडचा पॅक तयार करण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील जेल कोरफड जेलमध्ये मिश्र करा. तयार केलेले मिश्रण चेहऱ्याला लावा. 10 मिनीटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. 


मध आणि कोरफड जेल
मध चेहऱ्याला लावल्याने फंगल आणि बॅक्टीरियल इंफक्शन निघून जाते आणि जेहऱ्यावर ग्लो येतो. मध आणि कोरफड जेलचा फोस पॅक तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये दोन मोठे चमचे मध घ्या आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे कोरफड जेल मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला लावल्यानंतर 20 मिनीटांने चेहरा धुवा. आठवड्यातून दोन वेळा हा पॅक चेहऱ्याला लावा. 


साबणाचा वापर कमी करा 
 हिवाळ्यामध्ये स्किनमधील नॅचरल ऑइल (Natural Oils) कमी होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. साबणाने त्वचेतील नॅचरल ऑइल संपते. त्यामुळे अंघोळ करताना साबणाचा वापर कमी करावा. तसेच थंडीमध्ये अंघोळकेल्यानंतर  लोशन किंवा बॉडी ऑयलचा वापर करा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


संबंधित बातम्या


Health Tips : दररोज दूधात तूप टाकून प्या, पळून जातील आजार; काय आहेत फायदे?


Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत