मुंबई : मराठी भाषेचा ठसा कुणी पुसायचा प्रयत्न केला तर त्याला अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी जनसंबोधन करताना त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मातृभाषेच्या मंदिराचं भूमिपूजन आपण करत आहोत याचे समाधान आहे. मुंबई लढून मिळवली आहे, मराठी म्हटले की संघर्ष आलाच. माझे आजोबा पहिल्या पाच लढवय्यांमध्ये होते. शिवसेनाप्रमुख व्यंगचित्रकार होते. मला आज आनंद होतो की माझ्या कुटुंबियांचं मराठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान आहे. मराठी भाषेचा ठसा कोणी पुसायचा प्रयत्न केला तर त्यांला अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही. कोणीही यावं आणि आमच्या उरावर बसावं असं आम्ही खपवून घेणार नाही.' 


मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'मराठी भाषेसाठी कायदे केले जातायत ही वेळ का आली? अनेक जण मराठी भाषेवर बोलत आहेत. मात्र माझी विनंती आहे की मराठी भाषेवर नाही मराठी भाषेत बोला. आमच्यावर रोज टीका होते. बाळासाहेब ठाकरेंवर टीका होत होती की हे मराठी मराठी करतात आणि याची मुलं इंग्रजी शाळेत जातात. पण बाळासाहेब त्यावेळी बोलायचे शाळेत इंग्रजी घरात मराठी बोलायचं. भाषा शिकणे हा काही गुन्हा आहे का? छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भगवा नसता?'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha