Ajit Pawar In GST Bhavan Programme : मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो. तुम्ही मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमाला येतात. मात्र आमच्या विभागाच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे मतभेदाच्या बातम्या येतात. त्यामुळे तुम्हीच काय ते खरं सांगा, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. जीएसटी भवनच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी वक्तव्य केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थित होते. मात्र, अजित पवार यांनी केलेले विधान हे गंभीर नव्हते तर गमतीशीर होते. अजित दादांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतभेद सुरू असल्याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे उपरोधिक वक्तव्य केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आमच्या खात्याच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे मतभेद असल्याच्या बातम्या येत असल्याचे त्यांनी म्हटले. जीएसटी भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी म्हटले की, जीएसटी भवन भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या साक्षीने झाला आहे. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे सर्व निर्बंध हटवून ही भेट दिली आहे. मागील काळात आम्ही सत्तेत असताना आम्हाला ही वास्तू उभारायची होती. मागील सरकारने खर तर हे काम पुढे घेउन जायला पाहिजे होतं. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारने हे काम हाती घेतलं आहे. अर्थ विभागाचे हे काम असल्याने कोणताही निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
कर ज्या ठिकाणाहून मिळतो, त्या ठिकाणी चांगल्या सेवा दिल्या पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटले. जीएसटी कार्यालयात येणार स्टाफ थेट मेट्रो ने येता यावा यासाठी मेट्रो स्टेशन इमारतीच्या आतमध्ये करत आहोत. काम करतांना कर्मचारी यांना आनंद वाटला पाहिजे अशा इमारती उभ्या राहिल्या पाहिजे असेही अजित पवार यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- मुख्यमंत्री नाराज नाहीत, गृहखात्यामध्ये काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा केली जाईल: दिलीप वळसे-पाटील
- Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे नेमका कोणता 'पिक्चर' दाखवणार? आजच्या मेळाव्याकडे लक्ष
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha