CM Uddhav Thackeray Letter To PM Narendra Modi : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवलं आहे. नाशिक-मुंबई, मुंबई-पुणे हैदराबाद या हायस्पीड रेल्वे संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पाठवलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी दोन बुलेट ट्रेनचा प्रस्ताव पंतप्रधनांना पत्रातून दिलेला आहे. या बुलेट ट्रेनचा उल्लेख रेल्वे मंत्रालयाकडूनही करण्यात आला होता. त्यातील पहिला प्रस्ताव म्हणजे, नागपूर-नाशिक-मुंबई ही एक बुलेट ट्रेन करण्यात यावी आणि त्यासोबतच समृद्धी महामार्ग जो आहे, त्याच्या बाजूला जमीन आहे, त्यामुळे जमीन अधिगृहणही कमी करावं लागेल, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यापूर्वीचा मंजूर झालेला बुलेट ट्रेनचा प्रस्ताव गुजरात-मुंबई याचा या पत्रात उल्लेख करण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे :
रेल्वे मंत्रालयाने नागपूर-नाशिक-मुंबई आणि मुंबई-पुणे-हैदराबाद हे मार्ग हायस्पीड रेल्वेसाठी प्रस्तावित केले आहेत.
- नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोशन लिमिटेड या कंपनीला हे काम सोपवण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ एनएचएसआरसीएल ला या मार्गाचे रेखांकन अंतिम करण्यास सहकार्य मागितले आहे.
- त्यानुसार एनएचएसआरसीएल ने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या लगत रेखांकनाचा अभ्यास केला आहे.
- 15 मार्च 2021 रोजी एनएचएसआरसीएल चे प्रतिनिधी यांनी नागपूर मुंबई मार्गावरील रेखांकनाचे सादरीकरण केले. हा रेल कॉरिडॉर जमिनीपासून उंचीवर राहणार असून त्यासाठी साधारण 17.50 मीटर लांब आणि रुंद जागा लागणार आहे.
- याचा अभ्यास एमएसआरडीसीने केला असून या कामासारही अधिकची जागा हायस्पीड रेल्वेच्या कामासाठी लागणार असल्याचे निष्कर्ष निघाला.
- समृद्धीच्या विद्यमान 80 टक्के रस्त्यालगत ही हायस्पीड रेल्वे नेली जाऊ शकते.
- केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे समृद्धी महामार्गालगत हाय स्पीड रेल्वेचे काम सुरू करू शकते.
- जालना येथपर्यंत हा समृद्धी महामार्ग जाणार आहेच. जालना येथून जालना हैदराबाद एक्स्प्रेस महामार्गाला राज्य सरकारने अगोदरच मंजुरी दिली आहे. नांदेड हैदराबाद हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने प्रस्तावित केला आहे.
- मुंबई हैदराबाद हायस्पीड रेल्वेच्या प्लॅन देखील या महामार्गाच्या लगत जालना मार्गे करला जाऊ शकतो.
- पुणे- औरंगाबाद दरम्यानच्या मार्गावरही हायस्पीड रेल्वेची गरज आहे.
- औद्योगिक वृद्धीच्या दृष्टीने पुणे-नाशिक-औरंगाबाद-मुंबई हा मार्ग होणे गरजेचे आहे.
- पुणे- औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे हे वर्तुळ पूर्ण करेल.
- समृद्धी लगत हाय स्पीड रेल्वे सामावली जाणार आहेच. भारत सरकारने आता मुंबई हैदराबाद (व्हाया जालना) आणि आणि औरंगाबाद पुणे या नव्या मार्गाचे काम हाती घ्यावे. पत्र आणि त्यातील मुद्दे
महत्त्वाच्या इतर बातम्या :
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, अडसूळ-राणांचे एकमेकांवर गंभीर आरोप