मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) उपसमितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद (CM Eknath Shinde Press Conference Live)  घेतली.   मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चाललंय याचा जरांगे पाटील यांनी विचार करावा. तसेच हिंसक घटनांमागे कोण हे शोधलं पाहिजे , असे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  या पत्रकार परिषदेत बैठकीत काय काय आढावा झाला याची माहिती दिली.  


जाणून घेऊया या पत्रकार परिषदेतील दहा मुद्दे जाणून घेऊया. 


 11 हजार 530 जणांना उद्यापासून कुणबी दाखले देणार


न्या शिंदे  समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी (Kunbi Certificate)  सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  


मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चाललंय


मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चाललंय याचा जरांगे पाटील यांनी विचार करावा. तसेच हिंसक घटनांमागे कोण हे शोधलं पाहिजे  


उद्या मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल सादर करणार 


मराठा समाजाच्या आरक्षणास संदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची बैठक आता झाली. तपशीलवार चर्चा यामध्ये झाली आहेय. शिंदे समितीने एक प्रथम अहवाल सादर केला आहे
कॅबिनेटमध्ये स्वीकारून पुढची प्रक्रिया अमही करणार आहोत. 


दोन महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश


 समितीने दोन महिन्यांनी मुदत मागितली आहे. सरकारने दोन महिन्याची मुदत दिली आहे. त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे, लवकरात लवकर आपला अंतिम अहवाल सादर करा अस सरकारकडून सांगण्यात आला आहे.


क्युरेटिव्ह पिटीशन दाखल


क्युरेटिव्ह पिटीशन यासंदर्भात दाखल केली आहे. यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे.मागास आयोगाला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. इतर संस्था सुद्धा त्यांना मदत करणाप आहेत. क्युरेटिव्ह पिटीशन मधून मराठा समाज मागास आहे ते सिद्ध करता येईल.


तीन सदस्यीय तज्ज्ञांची समिती स्थापन


मूळ मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालं त्यावर सरकार काम करत आहे. तज्ज्ञ संस्था समितीला मदत करणार आहेत . सुप्रीम कोर्टाने मागे ज्या त्रुटी काढल्या  आहेत त्या दूर करण्यासाठी तीन सदस्यीय तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. 


मनोज जरांगे पाटील यांच्याशी उद्या चर्चा करणार


कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्याचा काम आम्ही करू. मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी आणि आपले उपसमिती सदस्य आणि अधिकारी यांच्याशी उद्या चर्चा करणार आहेत.  मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की थोडा वेळ सरकारला दिला पाहिजे.


टोकाचं पाऊल उचलू नका


 मराठा समाज शिस्तप्रिय आहे तरी काही लोक जाळपोळ तोडफोड सुरू आहे.  मराठा समाजाला  विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबाचा विचार करा ! आम्ही देणारे आहोत. शांततेचा आवाहन आम्ही सगळ्यांना करतो.


कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही


मागील सरकारचा अपयश आहे त्यांना मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयासमोर टिकवता आला नाही. कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात टिकवणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 


हेमंत पाटील यांनी भावनेपोटी राजीनामा दिला


हेमंत पाटील यांनी भावनेपोटी राजीनामा दिला असेल माझं त्यांच्याही बोलणं झाले आहे.  हे आंदोलन भरकटत जात आहे.


हे ही वाचा :


Maratha Reservation: 11 हजार 530 जणांना उद्यापासून कुणबी दाखले, मुख्यमंत्र्यांची घोषणा, 'जरागेंनी अवधी द्यावा, टिकणारं आरक्षण देऊ'