CM Eknath Shinde Konkan Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज कोकण दौऱ्यावर (Konkan Visit) जाणार आहेत. मुख्यमंत्री रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचा हा चौथा कोकण दौरा (Konkan Visit) आहे. रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसीमध्ये नव्यानं होणाऱ्या कोकाकोला प्रकल्पाचं भुमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शिवसेनेतल्या फुटीनंतर आदित्य ठाकरे, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेले दौरे आणि आता एकनाथ शिंदेंचे दौरे यावरून राजकीयदृष्ट्या आगामी काळात कोकणाचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित होतं असल्याचं पाहायला मिळत आहे. 


एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कोकणची ओळख आहे. आमदार खासदारांच्या संख्येवरून ही गोष्ट ध्यानात येते. दरम्यान शिवसेनेतल्या फुटीनंतर आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांनी केलेले दौरे आणि एकनाथ शिंदे त्यांचे होत असलेले दौरे यावरून राजकीय दृष्ट्या आगामी काळात कोकणाचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित होत आहे. शिवाय मुंबईतल्या राजकारणावर देखील कोकणी माणसाचा प्रभाव आहे. त्यामुळे आता शिंदेंमार्फत महायुती कोकणात आपला प्रचार करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.    


पंतप्रधान मोदींना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा : वैभव नाईक 


पंतप्रधान मोदींना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली आहे. कोकणातल्या अनेक समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष होत असल्याचंही वैभव नाईक यांनी अधोरेखित केलं आहे. इथले मच्छीमार, शेतकरी, शासकीय इमारत यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, इतर राज्यात प्रचारासाठी जातात, राज्यातले प्रश्न मात्र दुर्लक्षित आहेत, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. तसेच, यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलं नाही, कारवाईला आम्ही भीक घालत नाही, आम्ही मतं मांडत राहणार आहोत, असं म्हटलं आहे. 


पाहा व्हिडीओ : Cm Eknath Shinde Ratnagiri : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर : ABP Majha