CM Eknath Shinde Delhi Tour: आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा (Nagpur Hiwali Adhivseshan) दुसरा आठवडा अपेक्षेप्रमाणे वादळी सुरु झाला.  कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन (Karnataka Maharashtra Border Dispute) विदर्भातील नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Assembly Session) वातावरण तापलं . शिवाय कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवरील (Abdul Sattar) यांच्यावरील आरोपानं तापलेल्या वातावरणात अजूनच भर पडली. अशा वेळी विरोधकांनी हल्लाबोल केला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde)मात्र दिल्ली दौऱ्यावर होते. 


कर्नाटकनं त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राविरोधी (Maharashtra News) ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज विरोधकांकडून तशी मागणीही जोरात केली गेली. यानंतर सीमावादासंदर्भात ठराव आणणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्लीत सांगितलं. हा ठराव उद्या विधिमंडळात मंजूर केला जाईल.  


आज नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर वीर बाल दिनाचा कार्यक्रम होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात उपस्थित होते.  यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला गेले. ही भेट व्यक्तिगत सदिच्छा भेट होती असं शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.  


वीर बाल दिनाचा कार्यक्रम आणि लोकसभा अध्यक्षांची भेट


लोकसभा अध्यक्षांना भेटून मुंबईला परतताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी वीर बाल दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्राच्या निमंत्रणावरुन दिल्लीला आलो होतो. मुख्यमंत्री म्हणाले की, सीमावादाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत कायदा व सुवस्थेचा प्रश्न होऊ नये, याच्या सूचना केल्या आहेत. हा विषय 60 वर्षांपासूनचा आहे. असं असताना कोर्टातील प्रकरणावर परिणाम होऊ नये याची काळजी घ्यायला हव्या. जे आज बोलत आहेत त्यांनी सीमाभागातील लोकांच्या योजना बंद केल्या. टीका करणाऱ्यांनी माहिती घेऊन बोलावं. आम्ही पूर्णपणे सीमावासियांसाठी खंबीर आहोत. उद्या याबाबत आम्ही ठराव आणणार आहोत, असंही ते म्हणाले. 


कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत निर्माण झालेली सीमावादाची धग आता दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री थेट मोदींच्या मंचावर पोहोचले होते. या भेटीत अर्थातच या विषयावर चर्चा झाली असेल अंदाज आहे.  उद्या राज्याच्या उपराजधानीत सीमावादासंदर्भात ठराव होत असताना दिल्लीत कर्नाटक देखील महाराष्ट्राविरोधात ताकद लावणार आहे. त्यामुळे सीमावादाच्या रस्सीखेचीत कुणाचं पारडं जड राहतं,  हे पाहणं महत्वाचं आहे. 


ही बातमी देखील वाचा


सीमाप्रश्नाबाबत उद्या विधीमंडळात ठराव आणणार, मुख्यमंत्र्यांची दिल्लीत तर उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती