Devendra Fadnavis : जगातील मोठ्या अर्थाव्यवस्था बघितल्या तर शोषण दिसतं. आपण कोणाला लुटलं नाही. ज्या राजाने दिलं त्याला आपण मोठं मानलं. दुसऱ्याचं घेणाऱ्याला मोठं मानलं नाही. देशातील स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बघितली तर 1990 च्या दशकात आपली थट्टा उडवली जायची. मात्र 'हिंदू ग्रोथ रेट' जगाला दिशा देईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. जागतिक हिंदू आर्थिक परिषदेतून (World Hindu Economic Forum 2024) ते बोलत होते. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येत्या काळात मुंबई फिनटेकची राजधानी बनणार आहे. हिंदू आर्थिक परिषदेच्या आधारे आपण विकास कसा करु शकतो. यासंदर्भात अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत.  पश्चिमी सभ्यता आणि आपल्यात मूलभूत अंतर आहे. ज्यात जो ताकदवान असेल तो जिंकेल.  मात्र आपल्याकडे समाज कमकुवत माणसाची मदत करुन समोरच्याला जगायला लावेल, ही आपली सभ्यता आहे. जगातील मोठ्या अर्थाव्यवस्था बघितल्या तर शोषण दिसतं. आपण कोणाला लुटलं नाही. ज्या राजाने दिलं त्याला आपण मोठं मानलं. दुसऱ्याचं घेणाऱ्याला मोठं मानलं नाही. देशातील स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बघितली तर 1990 च्या दशकात आपली थट्टा उडवली जायची. पण 'हिंदू ग्रोथ रेट' जगाला दिशा देईल.  


2028 पर्यंत आपण 5 ट्रिलियनचा टप्पा गाठू


आपण आता तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जात आहोत. आपली जनसंख्या मोठी आहे. त्यामुळे आपण विकसित होऊ शकत नाही, असं बोललं जायचं. मात्र त्याला संसाधन आपण बनवलं आणि विकसित होऊ शकतो याचं आपण उदाहरण आहोत. अटल बिहारी वाजपेयींनी याची नीव राखली आहे. त्याला मोठं करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. भारत मोठ्या प्रमाणात पुढे जातोय. जगातील अर्थ व्यवस्था बघता आपण विचार करतो की, कॅपिटलिझममुळे गरीबी आणि श्रीमंतातील दरी वाढत आहे. आपण 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलंय. हेच हिंदू अर्थव्यवस्थेचे मॉडेल आहे. 2028 पर्यंत आपण 5 ट्रिलियनचा टप्पा गाठू. 2030 पर्यंत ७ ट्रिलियनपर्यंत जाऊ. आम्ही प्रयत्न करतोय, सगळ्यात पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्र बनेल. अर्धा टप्पा आम्ही मागच्या वर्षीच पार केलाय, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


डिटिजल इकॉनॉमी आणि एआयला स्वीकारायला हवे


ग्लोबल सप्लाय चेनमध्ये आपण एक महत्त्वाचा हिस्सा बनू शकतो. कोव्हिडमध्ये चीननं सप्लाय चेनवर आघात केला आणि ती बंद झाली.  लॉजिस्टिक्स महत्वाचे आहे, त्या उद्देशाने आम्ही राज्यात प्रयत्न केलेत.  हायस्पीड हायवे आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय. समृद्धी महामार्ग 16 जिल्ह्यांना जोडतो, जो थेट बंदरांना जोडतो. भारताचा कंटेनर ट्रॅफिक 60 टक्के जेएनपीटी घेतं. मात्र आम्ही दुसरा पर्याय उभा करतोय जो वाढवण बंदर आहे. वाढवण हे जेएनपीटीच्या चारपट आहे. त्यामुळे मोठा फायदा होईल.  भाजपचं सरकार राज्यात आल्यानंतर आम्ही 2014 पासून मोठे बदल केलेत. जवळपास 49 टक्के इन्फ्राचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरु आहेत.  सिलिंक, कोस्टल रोड आणि इन्फ्रामध्ये मोठी गुंतवणूक आम्ही केलीय. डिजिटल इकॉनॉमीकडे जाताना आम्ही महाराष्ट्राला डेटा कॅपिटल म्हणून पाहतोय.  डिटिजल  इकॉनॉमी आणि एआयला आपल्याला स्वीकारायला हवे. आपण तंत्रज्ञानाला आत्मसात केलं पाहिजे.  अर्थव्यवस्थेला त्या आधारेच आपण पुढे घेऊन जाऊ, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 



महाराष्ट्र देशाचा कणा बनेल


ग्रीन एनर्जीच्या आधारे आपण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारताच्या विकासाची यात्रा वेगाने सुरु झाली आहे. शाश्वत विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आर्थिक सामाजिक आणि संस्कृती निर्माण आपल्याला करायचा आहे. जग भारताकडे बघते आहे. महाराष्ट्र देशाचा कणा बनेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 


आणखी वाचा 


शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल, सत्तेत जाण्याच्या हालचाली, पण 'या' दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन