मुंबईः मुख्यमंत्री आणि रामदास कदम यांच्या वर्षा भेटिनंतर चक्र फिरली आहेत. शिर्डी साई संस्थानातील उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या वाट्याला देण्यास मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे. सोबतच तीन सदस्य पदं आणखी वाढवून देण्याचंही आश्वासन देण्यात आलं आहे.


 

 

साई संस्थानमध्ये भाजपाने शिवसेनेच्या वाट्याला एकही पद न दिल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला यापुढे कुठल्याही महामंडळात समाविष्ट न होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर रामदास कदम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत सेनेच्या दबावतंत्राला यश आलं आहे.

 

 

उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अखेर संस्थान कार्यकारिणीत उपाध्यक्षपदासह तीन पदं देण्याचं मान्य केलं आहे. सेनेकडून रविंद्र मिर्लेकर यांना उपाध्यक्ष पद देण्याची मागणी शिवसेनेने केली होती.