मुंबई : राज्यात ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारपासून राज्याभरात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाताळ (Christmas 2021) सणाच्या सेलिब्रेशनसाठी आधीपासून सरकारनं नियमावली घोषित केली होती. नाताळाचा सण मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने सण साजरे करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये आतापासूनच सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत. शिवाय नाताळ सण साजरा करण्यासाठीही ठराविक नियमांचं सर्वांना पालन करावं लागणार आहे.
यंदाचा नाताळ साजरा करण्यासाठीचे नियम खालीलप्रमाणं...
- ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने करावा
- स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये 50 % लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी जास्त जणांचा समावेश नसावा.
- कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी.
- सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबतच चर्च परिसराचं नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणं अनिवार्य
- चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक
- चर्चमध्ये प्रभू येशुचं स्तुतीगीत गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा समावेश करावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करावा
- चर्चच्या बाहेर परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नये
- कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि मिरवणूकीचे आयोजन करु नये.
- फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये
नाताळ सणासाठी आखून दिलेल्या या नियमावलीचं पालन करत नागरिकांनी प्रशासनाला मदत करत कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या या युद्धात हातभार लावावा असंच जाहीर आवाहन करण्यात आलं आहे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या
नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी करताय?, BMC चे नियम एकदा वाचाच
ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी
IRCTC : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात जाताय? 'या' ट्रेनचे मिळेल कन्फर्म तिकिट!