पालघर: पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्यात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना एका संतप्त मातेनं आपल्या दारातून परत पाठवलं. 30 ऑगस्ट रोजी तालुक्यातील सागर वाघ या मुलाचा कुपोषणानं मृत्यू झाला होता. त्यानंतर गेले 15 दिवस आदिवासी विकास मंत्री सावरा यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली नव्हती.


आज ते भेटीसाठी गेले असता मृत मुलाच्या नाराज मातेनं मंत्री सवारांची भेट घेण्यास नकार दिला आणि त्यांना दारातूनच हाकलून लावलं.

पालघर जिल्ह्यातील या आदीवासी पाड्यांमध्ये बऱ्याचदा कुपोषित मुलं आढळून येतात. अनेकदा यामुळे काही मुलं दगावतातही. मात्र, योग्य वेळी सरकारकडून मदत मिळत नसल्याचा आरोप येथील आदिवासींकडून करण्यात येत आहे.