मुंबईः मुंबई, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. परतीचा पाऊस जवळपास सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या या इशाऱ्याकडे लक्ष लागलं आहे.
मुंबईत गणपती विसर्जनाच्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. शहरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 39.84 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर पश्चिम उपनगरांत 37.93 मिमी पाऊस झाला असून पूर्व उपनगरात 36.37 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातं विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेवाडी गावात ढगफुटी झाली आहे. जिल्ह्यात तब्बल 221 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.