मुंबईमुख्यमंत्री लाडकी बहीण (Mukhyamantri Ladki Bahin Yojna)  योजनेच्या नोंदणीसाठी राज्यभरात महिलांसाठी तुफान गर्दी केली. महिलांना  15 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. मात्र अद्याप अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरु झाले नसले तरी पूर्वतयारी म्हणून कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी जिल्हातील सेतू केंद्रात तुफान गर्दी केले आहे. सोलापूर, अकोला, मालेगाव, नंदुरबार यासह अनेक ठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री ' माझी लाडकी बहिण ' योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून वय वर्ष  21 ते 60  दरम्यानच्या पात्र महिलांना शासनाकडून दरमहा 1500  रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याला आजपासून सुरुवात झाली असून जिल्हाभरातील सर्वच सेतू व तहसील कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी उसळलेली पहायला मिळाली आहे..नाशिकच्या मालेगाव येथील नवीन तहसील कार्यालयात सकाळपासून महिलांची गर्दी उसळल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली असून सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ उडाली आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी लगाणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासून संबंधित कार्यालयांमध्ये महिलांनी गर्दी केली..या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र रहिवाशी दाखला, उत्त्पन्न दाखलासह अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत.


नंदुरबार जिल्ह्यात महिलांची तुफान गर्दी 


 लाडकी बहीण योजनेअंतर्गत कागदपत्र जमण्यासाठी महिलांची सेतू केंद्र आणि शासकीय कार्यालयात कागदपत्रे जमिनीसाठी महिलांची तुफान गर्दी होत आहे. यातच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात कागदपत्रे जमवत असताना एक गर्दीत एका महिला चक्कर येऊन पडल्याने त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला असून या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. कमी दिवसाची मुदत असल्याचा असल्यामुळे फॉर्म भरण्यासाठी महिलांची तुफान गर्दी होताना पाहायला मिळत आहे.


अकोल्यात मोठी गर्दी 


 पहिल्याच दिवशी अकोल्यातील सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये नोंदणीसाठी महिलांनी मोठी गर्दी केलीय. योजनेत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रं जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेतू केंद्रांवर महिला आल्या होत्या. या योजनेत महिलांची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाणार आहे. आज पहिल्याच दिवशी नोंदणी केंद्रांवर महिलांनी मोठ्या उत्साहात नोंदणी केलीये. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रूपये मिळणार आहेत.


हे ही वाचा :


Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं