Eknath Shinde मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या डोळ्यावर एक शस्त्रक्रिया (Eye Surgery) पार पडली आहे. डोळ्याचा त्रास होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळ्याची तपासणी केली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर लेझर ट्रिटमेंटद्वारे (Laser treatment) शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या ठाण्याच्या घरी परतले आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी (Doctor) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
तीन लाख कारागीरांना विकासाच्या प्रवाहात आणणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दरम्यान, पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी पी.एम. विश्वकर्मा सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केली आहे. महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतही अग्रेसर राहील असा विश्वास आहे. या योजनेत जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी सहभागी व्हावं. या योजनेअंतर्गत 2028 पर्यंत, राज्यात साधारण तीन लाख कारागीरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.
अर्थसंकल्पावर काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
रोटी, कपडा, मकान देणारं मोदी सरकारचा अर्थसंकल्प आहे. आज कौशल्य विकास सुरु करण्यात आले आहे. आशा सेविकांसाठी यांना योजना आणली. कोणतीही दरवाढ न करता पायाभूत सुविधांसाठी ११ हजार कोटी अर्थसंकल्पात आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आलेले आहे. १ कोटी महिलांना लखपती बनविण्याचा निर्णय जो घेण्यात आला होता, ते वाढवून ३ कोटी महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य त्यांनी आजच्या अर्थसंकल्पात ठेवले आहे. महिलांसाठी सर्वाकल कॅन्सरवर योजना आणली आहे. महिलांसाठी आत्मनिर्भर व सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना त्यांनी या अर्थसंकल्पात आणल्या आहेत.
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
इंडिया आघाडीकडे १ नेता उरला नाही. त्यांचा सुपडा साफ झाला आहे. अबकी बार ४०० पार ही गॅरेंटी जनतेने घेतली आहे. घरी बसणाऱ्यांना लोकं घरीच बसवतात, काम करणाऱ्यांना पून्हा निवडून आणतात, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे याना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
आणखी वाचा