गडचिरोली : छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर चिप्पूरभट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना (Naxal Attack) कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या या नक्षलवावाद्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. छत्तीसगडच्या बिजापूर आणि सुकमाच्या बासागुडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील चिप्पूरभट्टी जंगल परिसरात आज सकाळपासून जवळ जवळ 4 तास सुरू असलेल्या या चकमकीत दोन महिला नक्षलवावाद्यांसह 6 जाणाचा खात्मा केला आहे. ही कारवाई कोब्रा 210, 205, सीआरपीएफची 229वी बटालियन आणि डीआरजी यांचा समावेश असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकाने संयुक्तिकरित्या केलीय.


तीन गावकऱ्यांवर अज्ञातांनी कुऱ्हाडीने वार करून हत्या 


छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा भागात होळीच्या दिवशी तीन गावकऱ्यांवर अज्ञातांनी कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली होती. या हत्येमागे नक्षलवादी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे चंद्रया मोदियम, अशोक भंडारी आणि करम रमेश असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक प्राणघात कारवाई नक्षलवाद्यांनी केल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी या घटनेचा शोध सुरू केला होता.


4 पुरुष माओवाद्यांसह 2 महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान


दरम्यान, आज सकाळी बसगुडा पोलीस स्टेशन क्षेत्रांतर्गत काही माओवाद्यांच्या उपस्थिती बाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता जंगलातून अचानक पोलिसांवर माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी देखील माओवाद्यांच्या या गोळीबाराला चोख उत्तर दिले. सुमारे चार तास चाललेल्या या चकमकीत 4 पुरुष माओवाद्यांचे तर 2 महिला माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. तर या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 


अशी आहेत मृत  नक्षलवाद्यांची नावे 



  • 1) पूनम नागेश एस/ओ ​​मासा, रहिवासी चिपूरभट्टी, पदनाम-प्लॅटून क्रमांक 10 डेप्युटी कमांडर, बक्षीस  -5 लाख

  • 2) कोवासी गंगी S/o बंदी, 27 वर्षे रहिवासी - बोडागुडा पोलीस स्टेशन एरबोर जिल्हा सुकमा, पद - ACM, क्षेत्र CNM अध्यक्ष, जगरगुंडा क्षेत्र समिती पुरस्कार - 5 लाख

  • 3) आयुतू पूनम फादर कोवा, 28 वर्षे रहिवासी चिपुरभट्टी, पद - प्लाटून क्रमांक 10 सदस्य, बक्षीस - 2 लाख

  • 4) वेट्टी सोनी पती नागेश, वय 30  वर्षे, रहिवासी गुंडम छितिमपारा पोलिस स्टेशन ताररेम, पदनाम-प्लॅटून क्रमांक 10 सदस्य, बक्षीस - 2  लाख

  • 5) सुक्का ओयाम उर्फ ​​विकास उर्फ ​​गुड्डी वडील मासे, वय 40 वर्षे, टेकलगुडा येथील रहिवासी, पद - स्मॉल ॲक्शन टीम कमांडर

  • 6) नुप्पो मोका वडील गंगा वय 30 वर्षे रा. पटेलपारा नरसापूर पदनाम मिलिशिया सेक्शन कमांडर. 


माओवादी घटनेतील सहभाग


 • 25/03/2024 रोजी बासागुडा पुसबाका रस्त्यावर तीन निरपराध गावकऱ्यांच्या हत्येत सहभागी


 • 12/02/2022 रोजी बसागुडा पोलीस स्टेशन हद्दीतील जिदावागु नाल्याजवळ CARIPU फोर्सवर झालेल्या हल्ल्यात सामील होते. ज्यात CARIPU 168 असिस्टंट कमांडंट श्री शांतिभूषण तिर्की शहीद झाले.


 • 03/04/2021 रोजी टेकलगुडियाम येथे झालेल्या चकमकीत पोलीस माओवादी सामील होते


 • याशिवाय, बासागुडा, ताररेम, उसूर, अवपल्ली भागातील विविध माओवादी घटनांमध्ये पोलीस ठाण्याचा सहभाग आहे.


इतर महत्वाच्या बातम्या