Vidarbha Weather Update: विदर्भात (Vidarbha ) गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा (Vidarbha Heat) सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी झालेल्या पावसानंतर आता पुन्हा तापमानात लक्षणीय वाढ होत असून आजघडीला विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या ( Heat) पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसच्या आकडा गाठला आहे. तर आज विदर्भात सर्वाधिक तापमान 41.5 अंश सेल्सिअस हे अकोल जिल्ह्याचे (Akola )नोंदविण्यात आले आहे. हे तापमान विदर्भासह राज्यातील सर्वाधिक असल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्याखालोखाल वाशिम येथे 41.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तर आगामी काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चाळीशीपार
महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होत असल्याचे निदर्शनात आले आहे. आज राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे 41.5 अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले आहे. तर त्या खालोखाल वाशिम येथे 41.4 अंश सेल्सिअस, वर्धा 40.5 अंश सेल्सिअस, अमरावती 40.4 अंश सेल्सिअस, बुलढाणा 40.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानची नोंद करण्यात आली आहे. आगामी काही दिवसात हळूहळू या तापमानात वाढ होणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
विदर्भात पुन्हा अवकाळी ढग
विदर्भात एकीकडे उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असताना दुसरीकडे काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांत राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये विदर्भात 31 मार्चला पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रती तास सोसाट्याच्या वादळवाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात अमरावती, नागपूर, चंद्रपुर, भंडार, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
असे आहे विदर्भाचे आजचे तापमान
जिल्हे | कमाल | किमान |
अकोला | 38.4 | 20.2 |
अमरावती | 37.0 | 20.7 |
बुलढाणा | 35.5 | 21.8 |
ब्रम्हपुरी | 37.4 | 22.0 |
चंद्रपूर | 38.0 | 20.4 |
गडचिरोली | 35.6 | 20.4 |
गोंदिया | 36.0 | 19.4 |
नागपूर | 37.4 | 19.8 |
वर्धा | 38.6 | 21.0 |
वाशिम | 39.4 | 18.8 |
यवतमाळ | 39.0 | 20.5 |
देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
उत्तर आणि पूर्व भारतातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशातील हवामानत बदल होताना पाहायला मिळत असल्याचेही हवामान विभागाच्या वतीने सागण्यात आले आहे. यात अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात जोरदार पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये 30 मार्चपासून जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तर आज 27 मार्च ते 31 मार्च या दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच उत्तर - पूर्व भारतातील काही भागातही वादळी वारा आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.