Chhatrapati Sambhaji Nagar News : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सातत्याने शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान आज पुन्हा अतिक्रमण विभागामार्फत दोन पथकाद्वारे शहरातील 4 वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात आली. ज्यात चंपाचौक ते कैसर कॉलनी पर्यंत मागील 30 वर्षांपासून असलेले अतिक्रमण काढण्यात आले. ज्यामध्ये एकूण 09 मिळकती असून, सदर जागेचा वापर दुकाने, हॉटेल व इतर व्यवसायासाठी करण्यात येत होता. त्यामुळे आज ही सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली व रस्ता मोकळा करण्यात आला. विशेष म्हणजे उद्या पुन्हा कैसर कॉलनी ते रेंगटीपुरा पर्यंत रस्ता बाधित अथवा अतिक्रमित मिळकती  काढण्यात येणार आहे. तर या सर्व अतिक्रमणधारकांना अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


आज करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान रविंद्र नगर ते कटकट गेट येथील 18 मीटर रुंद रस्त्यावरील एकूण 30 मालमत्ता धारकांचे ओटे व पायऱ्या काढन्यात आल्या. तसेच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने एन 12 हडको सिडको नर्सरी लगत असलेले अतिक्रमणे आज हटवण्यात आले. तसेच हडको भागातील ड्रेनेज लाईन वरील एकूण सात लोकांचे अतिक्रमण काढण्यात आले. ही कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. 


अतिक्रमणधारकांनी जवळपास दहा ते बारा फूट उंचीचे भिंत कंपाउंड वॉल बांधले 


आठ दिवसांपूर्वी हडको भागातील एन 12 येथील दुर्दैवी घटनेनंतर, प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता विभाग यांनी त्वरित अतिक्रमण काढून देणे बाबत कळविले. त्यामुळे आज सकाळी दहा वाजता स्थळ पाहणी करून सदरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी दिले होते. त्यानंतर या भागातील अतिक्रमण काढण्यास सुरवात झाली. मात्र यातील काही अतिक्रमणधारकांनी जवळपास दहा ते बारा फूट उंचीचे भिंत कंपाउंड वॉल बांधल्याने जेसीबी त्या पर्यंत जाऊ शकला नाही. त्यामुळे मजुरांच्या साह्याने सदरील अतिक्रमणे काढण्यात आले. यात दहा बाय पंधराचा हॉल, टॉयलेट बाथरूम, दहा बाय दहाची रूम, लहान जीना, अतिक्रमित लॉन, मोकळ्या जागेत करण्यात आलेले अतिक्रमणासह लहान मोठे सर्व अतिक्रमण मजुरांच्या सहाय्याने काढण्यात आले. 


इतर महत्वाच्या बातम्या:


छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली; पाणीपुरवठा विस्कळीत