मुंबई: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावरुन शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज (सोमवारी) सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक (Silver Oak) येथे दाखल झाले. छगन भुजबळ यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. छगन भुजबळ अचानक शरद पवार(Sharad Pawar) यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.  त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे. या भेटीच्या चर्चेदरम्यान अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. 


भेटीवर उमेश पाटील म्हणाले, छगन भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत. शरद पवार (Sharad Pawar) देखील राज्यासह देशातील मोठे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी छगन भुजबळ यांना विचारून जाण्याची आवश्कता नाही. राज्यात अनेकदा वेगवेगळ्या पक्षांचे नेते भेटायला जातात. ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आता वेगळी भूमिका घेतली आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याआधी आम्ही निर्णय घेण्याआधी त्याची संपुर्ण कल्पना शरद पवारांना होती असं देखील उमेश पाटलांनी यावेळी म्हटलं आहे. 


शरद पवारांबाबत (Sharad Pawar) कोणत्याही प्रकारची कटुता आमच्या कोणत्याही नेत्यांच्या मनामध्ये नाही आणि कधी नव्हती. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे दैवत आहेत. याचा उल्लेख आम्ही करतो देखील आणि आम्ही त्यांना दैवत मानतो देखील, त्यामुळे शरद पवारांना भेटण्यासाठी छगन भुजबळ गेले त्याचा वेगळा काही अर्थ घेण्याची गरज नाही. आम्ही सरकारमध्ये आहोत ते विरोधात आहेत. त्या दृष्टीकोनातून आम्ही एकमेकांवर टीका करतो. आपल्या भूमिका पटवून देताना टीका-टिपण्णी होत असते. याचा अर्थ एकमेकांना भेटू नये असा होत नाही. शरद पवारांना भेटण्यामध्ये काही अडचण नाही त्यातून कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही उमेश पाटील पुढे म्हणाले आहेत. 


काल टीका, आज भेट  


छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आपल्या या भाषणानंतर आज भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. भुजबळ यांच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीमागचे नेमके कारण काय? असे विचारले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आता छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. ते भेटीनंतर काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.   


VIDEO :  छगन भुजबळ आणि शरद पवार भेटीवर उमेश पाटील नेमकं काय म्हणाले?



संबंधित बातम्या 


Chhagan Bhujbal Meets Sharad Pawar : छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी!


Chhagan Bhujbal: काल होमपीचवर जाऊन घणाघाती टीका, आज शरद पवारांच्या भेटीला, छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय काय?