Chhagan Bhujbal On Devendra Fadnavis Maharashtra Govt : राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकार बदलाच्या चर्चेवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. सत्ता बदलाच्या चर्चांवरुन टोला लगावत भुजबळांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी अडीच वर्षे थांबावे लागेल. उत्तर प्रदेशात भाजपचे 50 आमदार कमी झाले. विरोधक जर एकत्र होऊन लढले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं, असं भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले की, भाजपची लाट कमी होताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचा परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे लोक कसे निवडून येतील याबाबत प्रयत्न करू, असं ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्षासंदर्भात राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा
विधानसभा अध्यक्षासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांसंदर्भात राज्यपालांकडे विनंती पत्र पाठविले आहे. लवकरात लवकर विधानसभा अध्यक्ष नेमा असे राज्यपालांनीच आदेशीत केले होते. राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. हायकोर्टाने देखील तशा सूचना दिल्या आहेत, असं ते म्हणाले.
आरक्षणबाबत येत्या 2 ते महिन्यात काम पूर्ण
ओबीसी आरक्षण संदर्भात बांठिया कमिशन नेमले आहे. बांठिया भारतीय जनगणना आयुक्त, मुख्य सचिव होते. बांठियांबरोबर काही निवृत्त अधिकारी ओबीसी आरक्षणा संदर्भात काम करत आहेत. आरक्षणाबाबत काम देखील सुरू झाले आहे. आरक्षणबाबत येत्या 2 ते महिन्यात काम पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्याप्रमाणे कायदा तयार केला आहे. प्रभाग रचना राज्य सरकारकडून तयार करून निवडणूक आयोगाला देणार आहोत. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक ठरवावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus : चीन आणि युरोपीय देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून सूचना
- China Corona : चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, चीनमध्ये शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी अडचणीत
- Russia Ukraine War : खार्किवजवळ रशियाच्या हवाई हल्ल्यात 21 ठार, मॉस्कोने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश झुगारला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha