Marathi Sahitya Sammelan : नाशिक : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) आज सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर (Dr Jayant Narlikar) संमेलनाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री सुभाष देसाई, कौटिकराव ठाले पाटील उपस्थितीत होते. संमेलनाच्या सुरुवातीला लेझीम खेळत दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांचा सहभाग मिळाला.


यंदाचं ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांविनाच होणार आहे. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. जयंत नारळीकर संमेलनाला प्रत्यक्षात उपस्थित राहणार नाहीत. (त्यांच्या कुटुंबीयांकडून ही माहिती देण्यात आली आहे.) संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर ऑनलाईन सहभागी होणार आहे. याबरोबरच आरोग्याच्या कारणास्थव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही संमेलनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर उद्घाटक विश्वास पाटील, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, नागनाथ कोतापल्ले, उत्तम कांबळे, यांच्यांसाह कृषी मंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. 


मराठीतील अग्रगण्य साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नगरीत आजपासून साहित्यिकांचा मेळा भरला आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते संमेलनस्थळी भुजबळ नॉलेज सिटीच्या मुख्य क्रांतीज्योती सावित्रीबाई, महात्मा फुले प्रवेशद्वाराजवळ ध्वजारोहण सोहळा रंगला आहे. 


महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा हा मेळा तीन दिवस भरणार आहे.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासमोर अनेक संकटं कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आधी वेगवेगळे वाद मग कोरोनाचं संकट, कोरोनामुळं बदललेल्या तारखा आणि नंतर नवीन ओमायक्रॉन व्हेरियंट यामुळं अनेक विघ्नं या संमेलनाच्या वाटेत आली. 


साहित्य संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्य रसिक, साहित्यिक, कलाकार दाखल झाले आहेत. आज सकाळी संमेलनाला सुरूवात होण्यापूर्वी सोलापूर येथील कलाकारांनी संत गाडगे महाराजांचा वेश परिधान करून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या बाहेर साफसफाई केली.  त्यानंतर कुसुमाग्रजांचे निवासस्थान असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महापौर निवासस्थान रामायण बंगला, टिळकवाडी सिग्नल, सीबीएस चौक- आंबेडकर पुतळा, शिवाजीरोड मार्गे नेहरू गार्डन मार्गे निघून सार्वजनिक वाचनालय इथे दिंडीचा समारोप झाला. दिंडीत शाळकरी मुलं, ढोल पथक, वारकरी सहभागी झाले होते, दिंडी मार्गावर रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात आले. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह साहित्य रसिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, लोकहितवादी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. 


ग्रंथ दिंडीनंतर मंत्री सुभाष देसाई आणि स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कौटिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कौतिक ठाले पाटील आणि छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुभाष देसाई, छगन भुजबळ यांच्यासह साहित्यिकांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवले. हे या सर्वांच्या हस्ते हे पत्र पत्रपेटीत टाकण्यात आले.  


स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी तारीख झाहीर जाल्यापासून संमेलनावर आलेल्या संटांवर मात करत अखेर आज आनंदपूर्ण वातावरणात संमेलनाला सुरूवात झाल्याचे सांगितले. स्वागताध्यक्ष भुजबळ म्हणाले, "कोरोनाची दुसरी लाट सरल्यानंतर संमेलन घ्यावी अशी सूचना आली. सूचना मिळताच दोन तीन आठवड्यात संमेलनाची संपूर्ण तयारी केली. तयारी सुरू असतानाच अचानक पाऊस आल्यानं आमची झोप उडाली. संमेलनस्थळी पाणी शिरले, चिखल झाला असे फोटो छापून येत होते. पण सभामंडपमध्ये पाणी येणार नाही असे मी सांगत होतो. एवढा पाऊस होऊनही सभामंडपात पाणी आले नाही आणि आज उत्साहपूर्ण वातावरणात संमेलनाला सुरूवात झाली. कुंभमेळ्यामुळे नाशिक जगच्या नकाशात आले आणि आता साहित्य संमेलनामूळे नवी ओळख निर्माण झाली." 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या


खगोलशास्त्र आणि फलज्योतिषमधील मूलभूत फरक सुशिक्षितांना कळत नसल्याचे पाहून मन खिन्न होते : डॉ जयंत नारळीकर  


साहित्य संमेलन पुन्हा वादात! संमेलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच स्थान, भाजपची तीव्र नाराजी