Chhagan Bhujbal मुंबई : 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो असल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अहमदनगर येथे झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यात (OBC Mahaelgar Melava) केला. त्यानंतर राज्यातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आता छगन भुजबळ हे सह्याद्री अतिथीगृहावर होणार मंत्रिमंडळ बैठकीसाठी (Cabinet Meeting) दाखल झाले आहेत. राजीनामा स्वीकारला नसल्याने मंत्रिमंडळ बैठकीत दाखल झाल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत भुजबळांच्या राजीनाम्यावर (Chhagan Bhujbal Resignation) चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  


मंत्रिमंडळ बैठकीला जाण्याआधी छगन भुजबळ यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सरकारला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी अंबडच्या सभेपूर्वी मी राजीनामा दिला होता. आता तो स्वीकारायचा नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हातात आहे. सध्या खुर्चीला चिकटून बसलो, अशी माझ्यावर टीका होत आहे. मात्र, मी राजीनामा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


न्हावी समाजाला दुखावण्याचा हेतू नव्हता


ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी न्हावी समाजाबाबत वक्तव्य केले. याबाबत ते म्हणाले की, न्हावी समाजाबाबत सध्या जो माझ्या बाबतचा व्हिडिओ फिरवला जात आहे तो चुकीचा आहे. एका गावामध्ये नाही समाजातील व्यक्तीने फेसबुकला मराठा समाजाच्या विरोधात पोस्ट लिहिली. त्यावेळी त्याच्या दुकानात केस दाढीसाठी जाऊ नये, असं मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आलं. त्या अनुषंगाने मी बोललो आहे. माझा कुठेही न्हावी समाजाला दुखावण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे.


प्रश्नांची उत्तरे आपोआप भरली जातात


सर्वेक्षणाबाबत छगन भुजबळ म्हणाले की,  शक्य आहे का? इतक्यात सर्वेक्षण होत असत? दिडशे प्रश्न आहेत. इथे 50-50 सर्वेक्षण होत आहेत. त्यासाठी 40-45 मिनिटे लागतात. हे जात विचारतात आणि 80-80 प्रश्नांची उत्तरे आपोआप भरली जातात, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.


भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये - बबनराव तायवाडे


मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने (Rashtriya OBC Mahasangh) केली आहे. भुजबळ यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर, ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचं रक्षण करेल, रस्त्यावर उतरेल, भुजबळांच्या राजीनाम्यावर ओबीसी महासंघाने ही भूमिका घेतली आहे. ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी एबीपी माझासोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. 


आणखी वाचा 


Deepak Kesarkar : मोदी अन् पवारांचे नाव घेत दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले, 'तुम्ही शब्द मोडला'