मुंबई: सार्वजनिक बॅंकांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि खातेदारांसाठी महत्त्वाची माहिती देणारी ही बातमी आहे. सार्वजनिक बॅंकांच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या ईज (EASE)नुसार बॅंकांच्या सुधारणांअंतर्गत ग्राहकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या शाखेच्या वर्गीकरणानुसार बॅंकांची वेळ एकसमान केली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेला म्हणजेच शुक्रवारी याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
IBA इंडियन बॅंक असोसिएशनने 6 ऑगस्ट 2019 रोजी काढलेल्या पत्राद्वारे ग्राहकांसाठी देशातील नॅशनलाइज्ड बॅंक शाखांच्या वेळेत तीन प्रकारचे वर्गीकरण केले आहे, ज्याची आता अंमलबजावणी करण्यात येत आहे. रहिवासी क्षेत्र (रेसिडेन्शियल एरिया), व्यापारी क्षेत्र (कमर्शिअल एरिया) आणि इतर अशा तीन भागात वेळांच्या बदलानुसार विभाजणी करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय बॅंक समिती आणि आयबीए (Indian Bank Association)च्या आदेशानुसार सार्वजनिक बॅंकांसाठी कामकाजाच्या वेळेत या प्रकारे तीन भागात वर्गीकरण केले आहे.
रहिवासी क्षेत्र (Residential): बॅंकांची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4, ग्राहकांसाठी सकाळी 9 ते दुपारी 3
व्यापारी क्षेत्र (Commercial) : बॅंकांची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6, ग्राहकांसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5
इतर बॅंकांची वेळ (Other Banks) : सकाळी 10 ते संध्याकाळी 5, ग्राहकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 5
जालन्यात चोरट्यांनी चक्क महाराष्ट्र बँकेचं एटीएमच पळवलं, पोलिसांकडून चोरांचा शोध सुरु | ABP Majha