Chandrapur Tiger attack issue : पूर्व विदर्भातील (Vidarbha News) 3 जिल्ह्यात 13 जणांचा बळी घेणाऱ्या CT वन वाघाला (Tiger Attack News) जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. मात्र असं असलं तरी पूर्व विदर्भात वाघांच्या हल्ल्यात लक्षणीय वाढ झाली असून या वर्षी पावसाळ्यात झालेले हल्ले तर चिंताजनकच म्हणावे लागतील. विदर्भाला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. मुबलक जंगल, प्रेबेस, हेल्दी जीन पूल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिक लोकांची वाघांप्रती असलेली सहिष्णुता यामुळे वाघांसाठी देशातील सर्वाधिक सुरक्षित आणि उज्वल भविष्य असलेला भाग म्हणून तज्ज्ञ विदर्भाकडे पाहतात. मात्र असं असलं तरी वाघांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक लोकांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न आता दखल घ्यावा इतका गंभीर बनला आहे.
बारमाही सिंचनाची सुविधा नसलेल्या विदर्भात डिसेंबर-जानेवारी उजाडला की शेतीची कामं संपतात आणि त्यानंतर ग्रामस्थ तेंदूपत्ता, मोहफुलं, बांबू, लाकूडफाटा आणि गवत गोळा करण्यासाठी जंगलाकडे वळतात आणि त्यामुळे या काळात वाघांचे हल्ले होतात आणि लोकं मृत्युमुखी पडतात ही थियरी आता सर्वमान्य झाली आहे. मात्र आता या थियरी ला छेद देणाऱ्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे साधारणपणे जुलै ते सप्टेंबर दरम्यान सहसा वाघाचे हल्ले होत नाही असं मानलं जात मात्र या वर्षी पावसाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यात 9 जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय तर पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात 6, भंडारा जिल्ह्यात 3 तर वर्धा जिल्ह्यात 2 जण वाघाच्या हल्ल्याचे बळी ठरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाळ्यात वाघांच्या हल्ल्यात 2021 मध्ये 7, 2020 मध्ये 5 तर 2019 मध्ये अवघ्या 2 जणांचा बळी गेला होता.
पावसाळ्यात वाघांचे हल्ले वाढल्यामुळे वाघांच्या हल्ल्यांसंबंधातल्या सध्या असलेल्या थिअरीज कालबाह्य झाल्या आहेत का? हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यावर तातडीने कारणांचा शोध घेऊन उपाय करणं आवश्यक आहे. विशेषतः वाघांचे भ्रमण मार्ग सुरक्षित करणे आवश्यक आहे, कारण याच भ्रमणमार्गांचा वापर करून वाघ पावसाळ्यात स्थलांतरण करतात.
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या जीव आणि वित्तहानीसाठी सरकारने नुकसानभरपाईच्या रक्कमेत मोठी वाढ केली आहे. मात्र फक्त पैसे देऊन सरकार आपले हात झटकू पाहत आहे का हा देखील प्रश्न आहे. विदर्भात फक्त जंगल, वाघ आणि पर्यटक वाढतील या कडे लक्ष देण्याऐवजी सरकारने स्थानिकांच्या जीवाचे मोल देखील ओळखले पाहिजे.
ही बातमी देखील वाचा
Bhandara CT1 Tiger : 4 जिल्ह्यात दहशत, 4 शेतकऱ्यांचा मृत्यू; वाघाच्या कोंबिंग ऑपरेशन वन विभाग सज्ज