Chandrapur News चंद्रपूर : चंद्रपूरच्या (Chandrapur News) ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रात एका वाघाने (Tiger Attack) 3 जणांचा बळी घेतल्याची घटना घडली होती. तपासाअंती हा वाघ दूसरा तिसरा कुणी नसून तो ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील भोला हा वाघ असल्याचे निष्पन्न झाले होते. या हिंसक वाघाला जेरबंद करण्याच्या अनुषंगाने वन विभाग या वाघाचा शोध घेत होते. अखेर या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. चिमूर तालुक्यातील निमढेला परिसरात डार्ट मारून रेस्क्यू टीमने या वाघाला जेरबंद केले आहे. भोलाच्या हल्ल्यात बुधवारी याच परिसरात एका 35 वर्षीय शेतकऱ्याचा जीव गेला होता. तर या आधी त्याच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वनविभागाने या वाघाला जेरबंद केले आहे. 


भोला हा भानुसखिंडी आणि छोटा मटका यांचा बछडा असून भोला पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. मात्र, अलिकडे त्याने केलेल्या हल्ल्यात तिघांचा नाहक बळी गेल्याने या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. परिणामी, आज अखेर त्याला जेरबंद करण्यात आले असून या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला रवाना करण्यात आले आहे. 


वाघाने 3 जणांचा घेतला बळी


खडसंगी बफर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रात भोलाने रामदेगी परिसरातील निमढेला येथील गुरे चारणाऱ्या सूर्यभान हजारे याला 30 ऑक्टोबर 2023 ला प्रथम आपले भक्ष्य बनविले होते. त्यानंतर निमढेला कुटीवरील वनमजूर रामचंद्र हजारे याला 25 जानेवारी 2024 ला ठार केले होते. तर अलिकडे 15 मे  रोजी खानगाव येथील अंकुश खोब्रागडे याला सकाळी शेतात ठार केले. तपासाअंती हा वाघ दूसरा तिसरा कुणी नसून तो ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील भोला हा वाघ असल्याचे निष्पन्न झाले होते.  


परिणामी, तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या भोला वाघाला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत होती. या मागणीची दखल घेत वनविभागाने भोला नामक वाघाला जेरबंद करण्यासाठी रामदेगी परिसरात रेस्क्यू टीम दाखल केली. अखेर आज त्याला अटक करण्यात आले आहे. 


भंडाऱ्याच्या सोनेगाव शेतशिवारात वाघाचं बस्तान 


पाणी आणि शिकारीच्या शोधात जंगलातून गावाकडं निघालेल्या वाघाने थेट शेतशिवारातच बस्तान मांडल्याचे भंडाऱ्यात बघायला मिळालय. यावेळी या वाघानं शेतशिवारात भटकणाऱ्या रानटी डुकरावर हल्ला चढवत त्याची शिकार केली. शेतशिवारात वाघ आल्याची बाब लगताच्या शेतात धान कापणी करणाऱ्या शेतमालक आणि मजुरांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी केलेल्या आरडाओरडने वाघानं तिथून पळ काढून शेताच्या लगत असलेल्या नाल्याच्या झुडूपात दबा धरून बसला. दरम्यान, तुमसर वन विभागाला शेतात वाघ आल्याची माहिती मिळताच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी फटाके फोडून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र या वाघाला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी शेतशिवारात प्रचंड गर्दी केली.


 


इतर महत्वाच्या बातम्या