Chandrakant Patil : आपल्या देशात शिक्षण नाही तर जेवण ही प्राथमिकता असल्याचे मत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्राची अवस्था पाहून संतांच्या आत्म्याला दुःख होत असेल असंही ते म्हणाले. मंत्री चंद्रकांत पाटील हे आज नांदेड विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभास उपस्थित होते. हा समारंभ संपल्यावर शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण ही आपल्या देशाची प्राथमिकता नाही तर दोन वेळचे जेवण ही आपली प्राथमिकता असल्याचं वक्तव्य केलंय.
महाराष्ट्राची सामाजिक वीण पूर्णपणे विस्कटली आहे. गावागावात जातीवरुन जे सुरू आहे ते महाराष्ट्राला मारक आहे. संतानी समतेची एकीची शिकवण दिली आहे, पण आताचा महाराष्ट्र पाहून संतांच्या आत्म्याला देखील वेदना होतील असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या: