Navratri Garba 2025: गरबा उत्सव मंडळाच्या मंडपात वराह देवतेचे (वराह प्राणी) फोटो लावून येणाऱ्याकडून पूजन करवून घेत प्रवेश द्यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. यामुळे नवरात्र (Navratri Utsav 2025) सुरु होण्यापूर्वीच वाद उद्भवण्याची शक्यता आहे. नवरात्रात गरबा उत्सवासाठी (Garba) विश्व हिंदू परिषदेची (VHP) ही नवी मागणी वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश देण्यात येऊ नये, असा पवित्रा घेतला आहे. त्यादृष्टीने आगमी नवरात्रौत्सवात  उपाययोजना करण्याची तयारी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. (Ban Muslim in Garba)

Continues below advertisement

नवरात्रात गरबा उत्सव मंडळात येणाऱ्या प्रत्येकाचे आधार कार्ड पाहून, त्या व्यक्तीचा धर्म तपासूनच आत मध्ये प्रवेश देण्यात यावा. प्रवेश घेणाऱ्याच्या मस्तकावर टिळा लावण्यात यावा. तसेच देवी मातेचा पूजन करायला लावण्यात यावं, या विश्व हिंदू परिषदेच्या नेहमीच्या मागण्यांशिवाय यंदा विहिंपने गरबा उत्सव मंडळाच्या मंडपात आयोजकांनी वराह देवतेचा (वराह) फोटो लावण्याची आणि त्याच पूजन करायला लावण्याची अपेक्षा ठेवली आहे. काही विधर्मी वराहपासून घृणा करतात, त्यामुळे वराहदेवतेचा चित्र पाहून ते गरबा उत्सव मंडळापासून दूर राहतील, असा तर्क विहिंपने आपल्या या मागणीच्या समर्थनार्थ समोर ठेवला आहे.

मुस्लिम तरुणांना  डीवचण्यासाठी अशी मागणी करणे योग्य आहे का, असा प्रश्न एबीपी माझा विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विचारला. तेव्हा वराह देवता आणि नवरात्राचा तसा धार्मिक संबंध नसला, तरी ते आमचे देवता आहे, ते अवतार आहे आणि काही विधर्मी चे वराह दर्शन केल्याने धर्म नष्ट होते, त्यांचा धर्म खंडित होतो असा त्यांचा समज आहे, म्हणून आम्ही तशी अट घातल्याचा विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आले. जे हिंदू धर्माला मानत नाही मूर्ती पूजेला मानत नाही, देवी मातेला मानत नाही, त्यांनी गरबा स्थळी प्रवेशच कशाला करावं, म्हणून आम्ही अशा सर्व अटी अट घातल्याचे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे.

Continues below advertisement

Garba Dandia: विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते या अटींचे पालन करून घेण्यासाठी काय करणार?

* वराह आमचे दैवत आहे, विष्णूचा अवतार आहे, म्हणून त्यांचा चित्र तिथे असावे. 

* या अटींचे पालन करून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आमचे कार्यकर्ते गरबा व नवरात्र उत्सव मंडळांशी संपर्क करत आहेत. 

* विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे कार्यकर्ते प्रत्येक गरबा उत्सव मंडळात जातील आणि सर्व स्थितीवर तसेच असामाजिक तत्वांवर, विधर्मी लोकांवर नजर ठेवून राहतील.. 

* तिथे काही वेगळं दिसल्यास आयोजन मंडळाला संपर्क साधून ते दुरुस्त करण्यास सांगतील, त्यांनी न ऐकल्यास पोलिसांना या संदर्भात कळविले जाईल.

आणखी वाचा

नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी? प्रवेश करणाऱ्यांचं आधार कार्ड तपासा, विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर बावनकुळेही म्हणाले...