Ambadas Danve Vs Chandrakant Khaire : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) उमेदवारीवरून ठाकरे गटात नाराजी पाहायला मिळत असून, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) देखील इच्छुक आहे. विशेष म्हणजे दोनही नेत्यांनी काल एकत्र विमान प्रवास करत मुंबई गाठली. तसेच, दोनही नेते काल उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyay Yatra) सभेत पाहायला मिळाले. पण अजूनही उमेदवारी कुणाला यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्यामुळे संभाजीनगरची उमेदवारी दानवे की खैरे कुणाला मिळणार हा प्रश्न अजूनही कायम आहे.


छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे महायुतीत या मतदारसंघावरून भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात उमेदवारीसाठी संघर्ष पाहायला मिळत आहे. खैरे आणि दानवे दोनही नेते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच खैरे यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. अशात दानवे यांनी देखील उमेदवारीसाठी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. तसेच खैरे निवडून येण्याशी शक्यता कमी असल्याचे देखील दानवे म्हणाले आहेत. त्यामुळे दानवे शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अशात दोनही नेते रविवारी ठाकरेंसोबत भारत जोडो यात्रेच्या सभेत पाहायला मिळाले. पण उमेदवारी कुणाला यावर अंतिम निर्णय अजूनही होऊ शकला नाही. 


एकाच विमानातून प्रवास...


संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारीवरून खैरे आणि दानवे यांच्याकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, याच दोनही नेत्यांनी रविवारी एकाच विमानातून प्रवास करत मुंबई गाठली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी ते मुंबईत गेले होते. 


दानवे शिंदेसेनेत जाणार?


संभाजीनगर लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अंबादास दानवे यांची वरिष्ठांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आज मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगत नवा बॉम्ब टाकला आहे. आमच्याकडे संभाजीनगरच्या जागेसाठी दोन सिक्रेट उमेदवार असल्याचे देखील म्हटले आहे. त्यामुळे दानवे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र, आपण ठाकरेंची साथ सोडणार नाही असे दानवे यांनी स्पष्ट केले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या : 


Ambadas Danve: शिंदे गटात गेलास तर तुझा आणि माझा संबंध संपला, उद्धव ठाकरेंशी बेईमानी करु नको; अंबादास दानवेंच्या आईची सक्त ताकीद