Uddhav Thackeray Dasara Melava : जर तुम्हाला इतिहासामध्ये तुमचं नाव अभिमानाने घ्यावा असं वाटत असेल तर आज ती वेळ आहे लोकशाही वाचवा लोकशाही वाचवा लोकशाही वाचवा तारीख आणि बाहेर भाषणं देऊ नका निर्णय घ्या निर्णय घ्या, चंद्रचूड साहेब अजूनही वेळ गेलेली नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात लांबलेल्या शिवसेना केसवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना लगावला. ठाकरे म्हणाले की, चंद्रचूड बोलले की, मला निवृत्तीनंतर इतिहासात काय म्हणून दाखल घेतली जाईल माहीत नाही, पण चंद्रचूड साहेब अजूनही वेळ गेलेली नसल्याचे सांगत जे बाहेर बोलत आहात ते आत बोला आणि न्याय द्या, असा टोलाही लगावला. तीन सरन्यायाधीश शिवसेना प्रकरणात न्याय करू शकले नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 



तीन सरन्यायाधीश न्याय देऊ शकले नाहीत 


उद्धव ठाकरे म्हणाले की, बाहेर बोलून न्याय मिळत नसतो. जे तुम्ही बाहेर बोलत आहे ते तुम्ही आत न्यायालयामध्ये द्या. मला संपूर्ण देशातील लोकशाही तुमच्याकडे बघत आहे. तुम्ही गणपती पूजनाला मोदींना बोलावलं ठीक आहे. गणपतीची पूजा जरूर करा, पण माझ्या न्याय मंदिरात तुम्ही येता तेव्हा तुम्ही माझ्या न्याय देवतेला अभिमान वाटेल असे करता येईल हे पाहिलं पाहिजे. जगातील अशी एक विचित्र केस आहे की तीन सरन्यायाधीश त्यांची कारकीर्द संपवून गेले पण ज्या लोकशाहीमध्ये सरन्यायाधीश झाले त्या लोकशाहीत ते न्याय देऊ शकले नाहीत. ही लोकशाहीची थट्टा आहे. न्याय मंदिर सर्वोच्च आहे, पण जनतेचं माझं सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्याच न्यायालयात आलो आहे. 


आम्हाला न्याय देवता पावणार तरी कशी?


त्यांनी सांगितले की, न्यायालयाचे दारं दारं ठोकून ठोकून ठोकून आमचे हात दुखायला लागले, पण न्याय मंदिराचे दरवाजे उघडत नाहीत आम्हाला न्याय देवता पावणार तरी कशी? आमच्या न्याय मिळणार तरी कशी? एखाद्या ऋतुराष्ट्र सारखा जर का तिकडे बसला आणि समोर लोकशाहीचे वस्त्रहरण होताना सुद्धा माझं पुढे काय होणार याची चिंता करत असेल तर मग मी तुमच्याबद्दल निवृत्त झाल्यानंतरच बोलेन. इतरवेळी बोलल्यानंतर तारीख पे तारीख असते, पण मी आता काही बोललो, तर मी  घरी पोहोचेपर्यंत तुमचा हातोडा डोक्यात पडेल. 


इतर महत्वाच्या बातम्या