मुंबई : संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोव्हिड-19 आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पत्र लिहिले आहे. सर्व जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ओमायक्रॉन व्हेरीयंट डेल्टा व्हेरीयंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पत्राद्वारे राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. कन्टेन्मेंट झोन, टेस्टिंग आणि सर्वेलन्स, क्लिनिकल मॅनेजमेंट, लसीकरण आणि कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात केंद्राने राज्यांना नाईट कर्फ्यू, मोकळ्या जागेतील सभा तसेच लग्नसमारंभ, अंत्य यात्रेवर नियंत्रण घालण्यास सांगितले आहे.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी केली आहे. तसंच 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबात निर्णय घ्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे.
देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 200 वर
देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहायला मिळतोय. दिल्लीत सोमवारी दिवसभरात ओमायक्रॉनचे 24 नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत रविवारीही आठ नव्या ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली होती. त्यामुळे दिल्लीतील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 54 झाली आहे. तर महाराष्ट्रातील ओमायक्रॉनबाधितांचा आकडाही 65 वर गेला आहे.
संबंधित बातम्या :
- Omicron : तिसरी लाट आली तर ओमायक्रॉनचीच, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा
- Omicron : धोक्याची घंटा! देशात 200 ओमायक्रॉनबाधित, दिल्लीत एका दिवसात 24 रुग्ण
- South Africa Tournament : दक्षिण आफ्रिकेची 'ही' स्पर्धा कोरोनामुळे रद्द , टीम इंडियाच्या दौऱ्यादरम्यान मोठा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha