मुंबई : होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोकणवासीयांची शिमग्यासाठी कोकणात जायची लगबग देखील अवघ्या काही दिवसांत सुरु होईल. त्याच पार्श्ववभूमीवर मध्य रेल्वकडून (Central railway) होळी विशेष 112 ट्रेन (Holi Special Train) चालवण्यात येणार आहे. यामधील लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई - थिवि रेल्वेच्या विशेष 6 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुणे - सावंतवाडी साप्ताहिक वातानुकूलित विशेष ट्रेन,पनवेल - सावंतवाडी साप्ताहिक वातानुकूलित विशेष ट्रेन,पनवेल - थिवि साप्ताहिक विशेष ट्रेन देखील चालवल्या जाणार आहेत.   यामुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं सांगण्यात येत आहे. 


याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई - बनारस साप्ताहिक विशेष ट्रेन, लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई - दानापूर द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष ट्रेन,लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई - समस्तीपूर साप्ताहिक अतिजलद विशेष ट्रेन,  लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - प्रयागराज साप्ताहिक अतिजलद वातानुकूलित विशेष ट्रेन चालवल्या जातील. होळीनिमित्ताने अनेकजण बनारसला जाण्याचा देखील प्लॅन करत असतात. तसेच यंदा होळी 24 मार्च आणि धुलिवंदन 25 मार्च रोजी आले आहे. शनिवार रविवार जोडून धुलिवंदनाची सुट्टी आल्याने प्रवाश्यांसाठी ही मध्य रेल्वेकडून विशेष सेवा पुरवली जाणार आहे. 


गाड्यांसाठी बुकींग सुरु


या सर्व विशेष गाड्यांसाठीचे बुकींग 8 मार्चपासून सुरु झाले आहे. www.irctc.co.in  या अधिकृत संकेतस्थळावरुन हे बुकींग करता येणार आहे. तसेच प्रवाशी युटीएस प्रणालीद्वारे देखील तिकीटे बुक करु शकतील. या संपूर्ण गाड्यांचा तपशील  www.enquiry.indianrail.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच एनटीईएस ॲपद्वारे देखील ही माहिती मिळू शकते. त्यामुळे 
प्रवाशांनी या विस्तारित सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 


असं असेल विशेष गाड्यांचं वेळापत्रक
लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई - बनारस साप्ताहिक विशेष (६ फेऱ्या)
01053 विशेष दि. १३.०३.२०२४, दि. २०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी  १६.०५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01054 विशेष दि. १४.०३.२०२४, दि.२१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी बनारस येथून २०.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता  पोहोचेल. (३ फेऱ्या) 


थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी. 


संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे).


लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई - दानापूर द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष (६  फेऱ्या)
01409 विशेष दि.२३.०३.२०२४, दि. २५.०३.२०२४ आणि दि.३०.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १७.०० वाजता  पोहोचेल. (३ फेऱ्या)
01410 विशेष दि. २४.०३.२०२४, दि.२६.०३.२०२४ आणि दि. ३१.०३.२०२४ रोजी दानापूर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (३फेऱ्या) 


थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मैहर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय आणि आरा. 


संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे).


लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई - समस्तीपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (4  फेऱ्या)
01043 विशेष दि. २१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.१५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
01044 विशेष दि. २२.०३.२०२४ आणि दि.२९.०३.२०२४ रोजी समस्तीपूर येथून २३.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या) 


थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर. 


संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे ).


लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - प्रयागराज साप्ताहिक अतिजलद वातानुकूलित विशेष (८ फेऱ्या)
01045 विशेष दि. १२.०३.२०२४, दि. १९.०३.२०२४, दि. २६.०३.२०२४ आणि दि. ०२.०४.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि प्रयागराज येथे दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
01046 विशेष दि. १३.०३.२०२४, दि.२०.०३.२०२४, दि. २७.०३.२०२४ आणि दि. ०३.०४.२०२४ रोजी प्रयागराज येथून १८.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता  पोहोचेल. (४ फेऱ्या) 


थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर. 


संरचना: १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार (२२ डब्बे)


लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई - थिवि साप्ताहिक वातानुकूलित विशेष (६ फेऱ्या)
01187 विशेष दि. १४.०३.२०२४, दि. २१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २२.१५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ०९.५० वाजता  पोहोचेल. (३ फेऱ्या)
01188 विशेष दि. १५.०३.२०२४, दि.२२.०३.२०२४ आणि दि. २९.०३.२०२४ रोजी थिवि येथून १६.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या) 


थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड. 


संरचना: १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार (२२डब्बे)


पुणे - कानपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (४  फेऱ्या)
01037 विशेष दि. २०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी पुणे येथून ०६.३५ वाजता सुटेल आणि कानपूर सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
01038 विशेष दि. २१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी कानपूर सेंट्रल येथून ०८.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १२.०५ वाजता  पोहोचेल. (२ फेऱ्या) 


थांबे: दौंड कॉर्डलाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि ओराई. 


संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ सामान्य द्वितीय श्रेणी. (१७ डब्बे)


लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - गोरखपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (६  फेऱ्या)
01123 विशेष दि. १५.०३.२०१४, दि. २२.०३.२०२४ आणि दि. २९.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १८.५५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01124 विशेष दि. १६.०३.२०२४, २३.०३.२०२४ आणि दि. ३०.०३.२०२४ रोजी गोरखपूर येथून २१.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या) 


थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती. 


संरचना: २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, १ गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी (२१ डब्बे)


पुणे - सावंतवाडी साप्ताहिक वातानुकूलित विशेष (६  फेऱ्या)
01441 विशेष गाडी दि. १२.०३.२०२४, दि.१९.०३.२०२४ आणि दि. २६.०३.२०२४ रोजी पुणे येथून ०९.३५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे त्याच दिवशी २२.३० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01442 विशेष दि. १३.०३.२०२४, दि.२०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी सावंतवाडी येथून २३.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या) 


थांबे: लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ. 


संरचना: ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ गार्डस् ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे)


पनवेल - सावंतवाडी साप्ताहिक वातानुकूलित विशेष (६  फेऱ्या)
01443 विशेष दि. १३.०३.२०२४, दि. २०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी पनवेल येथून ०९.४० वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे त्याच दिवशी २०.०५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01444 विशेष गाडी दि. १२.०३.२०२४, दि. १९.०३.२०२४ आणि दि.२६.०३.२०२४ रोजी सावंतवाडी येथून २३.२५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०८.४० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या) 


थांबे: रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ. 


संरचना: ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ गार्डस् ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे)


लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई - थिवि साप्ताहिक विशेष (६  फेऱ्या)
01107 विशेष दि. १५.०३.२०२४, दि. २२.०३.२०२४ आणि दि.२९.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २२.१५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ०९.५० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01108 विशेष दि. १७.०३.२०२४, दि.२४.०३.२०२४ आणि दि. ३१.०३.२०२४ रोजी थिवि येथून ११.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या) 


थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड. 


संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित आणि २ लगेजसह   गार्डस् ब्रेक व्हॅन आणि १० सामान्य द्वितीय श्रेणी (१८ डब्बे)


पनवेल - थिवि साप्ताहिक विशेष (६ फेर्‍या)
01109 विशेष दि. १६.०३.२०२४, दि.२३.०३.२०२४ आणि दि.३०.०३.२०२४ रोजी पनवेल येथून २३.५५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ०९.५० वाजता पोहोचेल. (३ फेर्‍या)
01110 विशेष दि. १६.०३.२०२४, दि.२३.०३.२०२४ आणि दि. ३०.०३.२०२४ रोजी थिवि येथून ११.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २२.१५ वाजता पोहोचेल. (३ फेर्‍या) 


थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड. 


संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित आणि २ लगेजसह  गार्डस् ब्रेक व्हॅन आणि १० सामान्य द्वितीय श्रेणी (१८ डब्बे)


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  मुंबई - गोरखपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (६ फेर्‍या)
01103 विशेष दि. १४.०३.२०२४, दि.२१.०३.२०२४ आणि दि.२८.०३.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.३५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल. (३ फेर्‍या)
01104 विशेष गाडी दि. १६.०३.२०२४, दि. २३.०३.२०२४ आणि दि. ३०.०३.२०२४ रोजी गोरखपूर येथून १५.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या) 


थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती.


संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे)


पुणे - थिवि साप्ताहिक विशेष (८ फेर्‍या)
01445 विशेष दि. ०८.०३.२०२४, दि. १५.०३.२०२४, दि.२२.०३.२०२४ आणि दि. २९.०३.२०२४ रोजी पुणे येथून १८.४५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
01446 विशेष दि. १०.०३.२०२४, दि. १७.०३.२०२४, दि.२४.०३.२०२४ आणि दि. ३१.०३.२०२४ रोजी थिवि येथून ०९.४५ वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (४ फेर्‍या) 


थांबे: लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड. 


संरचना: १ द्वितीय वातानुकूलित , ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२२ डब्बे)     


पनवेल - थिवि साप्ताहिक विशेष (८ फेर्‍या)
01447 विशेष दि. ०९.०३.२०२४, दि.१६.०३.२०२४, दि.२३.०३.२०२४ ते दि.३०.०३.२०२४ रोजी पनवेल येथून २२.०० वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
01448 विशेष दि. १०.०३.२०२४, दि. १७.०३.२०२४, दि.२४.०३.२०२४ आणि दि.३१.०३.२०२४ रोजी थिवि येथून ०९.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी संध्याकाळी २१.०० वाजता पोहोचेल. (४ फेर्‍या) 


थांबे: पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड. 


संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२२ डब्बे)


पुणे - दानापूर साप्ताहिक अतिजलद विशेष (४ फेर्‍या)
01105 विशेष गाडी दि. १७.०३.२०२४ आणि दि. २४.०३.२०२४ रोजी पुणे येथून संध्याकाळी १६.१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी २२.०० वाजता पोहोचेल. (२ फेर्‍या)
01106 विशेष दि. १८.०३.२०२४ आणि दि. २५.०३.२०२४ रोजी दानापूर येथून २३.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी सायंकाळी ०६.२५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या) 


थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर (फक्त 01106 साठी), कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा. 


संरचना: १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी (२२ डब्बे)


रोहा - चिपळूण अनारक्षित विशेष मेमू (२२ सेवा)
01597 मेमू ०८/०३, ०९/०३, ११/०३, १५/०३, १६/०३, १८/०३, २२/०३, २३/०३, २५/०३, २९/०३, ३०/०३ रोजी रोहा येथून ११.०५ वाजता सुटेल  आणि चिपळूण येथे त्याच दिवशी   १३.३० वाजता पोहोचेल. (११ फेर्‍या)
01598 मेमू विशेष ०८/०३/२०२४, ०९/०३, ११/०३, १५/०३, १६/०३, १८/०३, २२/०३, २३/०३, २५/०३, २९/०३ आणि ३०/०३/२०२४ रोजी चिपळूण येथून १३.४५ वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. (११ फेऱ्या) 


थांबे: कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखौटी, कळंबणी, खेड आणि अंजनी. 


संरचना: १२ कार मेमू


आरक्षण: होळी विशेष गाडी क्र. 01445/01446 आणि 01447/01448 या विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग आधीच दि. ०८.०३.२०२४ रोजी सुरू झाले आहे आणि होळी विशेष गाडी क्रमांक 01053, 01409, 01043, 01045, 01187/01188, 01037, 01123, 01442, 01443/01444, 01107/01108, 01109/01110 आणि 01105 यांचे बुकिंग विशेष शुल्कासह दि. १०.०३.२०२४
 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. 01597/01598 अनारक्षित म्हणून चालेल आणि यूटीएस प्रणालीद्वारे तिकिटे बुक करता येतील.


या विशेष ट्रेन्सच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.


प्रवाशांनी या विस्तारित सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.