मुंबई : "शिंदे (Maharashtra Cm Eknath Shinde) गटालाच दसरा मेळाव्यासाठी (Dasra Melava) शिवाजी पार्कवर परवानगी मिळेल. शिवाय धनुष्यबाणही शिंदेंकडेच राहणार आहे. चांगल्या गोष्टींचं कायम कौतुक करावं, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांना चांगलं बोलताच येत नाही. त्यांच्याकडे चांगली वाक्य नसली तर त्यांनी मला फोन करावा, माझ्याकडे चांगली वाक्य आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी लगावलाय. नारायण राणे यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
शिवसेनेच्या (shiv sena) दसरा मेळाव्याबाबत बोलताना यावर कोर्टातून निकाल लागेल असे मत राणे यांनी व्यक्त केले. याबरोबरच कोकणातील नाणार प्रकल्प हा कोकणातच राहिल असे देखील यावेळी नारायण राणे म्हणाले. "नाणार होणारच आणि तोही कोकणातच होणार, कोणाचाही विरोध चालू देणार नाही. नाणार प्रकल्प हातून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी स्वतः मंत्री आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे, असे राणे म्हणाले.
"2024 ला भाजपचे 403 खासदार असतील, गोवा आणि दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार असेल. शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात भाजपच्या मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व मुख्यमंत्री पद सोडलं तेव्हाच संपलं, उध्दव ठाकरे देशात आणि राज्यात कुठेही नाहीत, फक्त मातोश्रीच्या कक्षेत त्यांचे अस्तित्व आहे, अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
नारायण राणे म्हणाले, "लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना आर्थिक मदत केंद्र सरकार करत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरची घोषणा केली, यासाठी उद्योग क्षेत्रात प्रगती होणं गरजेचं आहे. रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे, निर्यात वाढायला पाहिजे. GDP वाढावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आपल्या देशात शिक्षणसंस्था कमी आहेत. माझ्या विविध शैक्षणिक संस्था आहेत, तेथे आम्ही दर्जेदार शिक्षण देत असतो. देशात 26 टक्के निरक्षरता तर महाराष्ट्रात 18 टक्के निरक्षरता आहे. निरक्षरता कमी करण्यासाठी कामाला लागा."
महत्वाच्या बातम्या