मुंबई : "आम्ही तोडफोड करून राज्य करत नाही. मात्र ब्रिटिश गेल्यानंतर ब्रिटिशांच्या विचाराने चालणारी काँग्रेस पार्टी आहे. ज्यांनी नेहमीच भारत तोडण्याचं काम केलं तेच भारत जोडो यात्रा काढत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi)  प्रवासावर निघाले आहेत, परंतु, यावेळी ते धर्माधर्मांत भांडण लावण्याचं काम करतात, असा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी काँग्रेसवर केलाय. 


अनुराग ठाकूर आजपासून तीन दिवस कल्याण लोकसभा दौऱ्यावर आहेत. आज डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अनुराग ठाकूर यांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना अनुराग ठाकूर यांनी दौऱ्याचं स्वरूप स्पष्ट केलं. तुम्ही जय श्रीरामचे नारे लावताय, पण यासाठी तुम्हाला चारशे वर्षे लढाई लढावी लागली. राम लल्लाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी भव्य राम मंदिर बनावं याचा फक्त विचार करत होतो, कोर्टात याची लढाई लढावी लागली, मात्र नरेंद्र मोदींचे सरकार बनलं. आता पुढच्या वर्षभरात भव्य राम मंदिर तयार होईल.  


"अमित शहा यांनी पुढील निवडणुका युतीमध्ये होणार असल्याचं स्पष्ट केलंय"


"राज्यात हे सरकार आल्यानंतर लोकांमध्ये उत्साह आणि चैतन्याचं वातावरण आहे. गेल्या दोन महिन्यात रेकॉर्ड तोड निर्णय घेण्यात आले आहेत. साठ दिवसात हे झाले आहे. अनुराग ठाकूर कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करतात. त्यामुळे आता काय होणार याबाबत अनेक जणांनी प्रश्न विचारले. मात्र याबाबत अमित शहा यांनी  दौऱ्या दरम्यान येत्या काळात प्रत्येक निवडणूक ही खरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये लढवण्यात येईल असे स्पष्ट सांगितले आहे, असे श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.  


दरम्यान, डोंबिवलीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानतंर अनुराग ठाकूर श्रीकांत शिंदे यांच्या निवास्थानी  गेले. त्याठिकाणी शिंदे यांनी अनुराग ठाकूर यांचा सत्कार केला. त्यानंतर अनुराग ठाकूर आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.  


महत्वाच्या बातम्या


Shivsena: ...तर, तुम्हाला जुनी शिवसेना दाखवून देऊ; शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा इशारा 


Shivsena Prabhadevi : एकनाथ शिंदेंसोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न; आमदार सदा सरवणकरांचा आरोप